स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मुंबई कैषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटच्या या समस्येबाबत आम्ही १० जानेवारी २०२४ रोजीही लेखी निवेदन दिले होते. आपणाकडून ते निवेदन “RAJESH KUMAR ACS (Coop & Mkt)” acs.coop@maharashtra.gov.in>
यांना फॉरवर्ड करण्यात आले आहे. यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. समस्या गंभीर आहे. उद्या या धोकादायक मार्केटमध्ये पडझड होवून जिवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण असणार? याचेही राज्य सरकारने आम्हाला उत्तर द्यावे अशी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबईतील तुर्भे येथे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये कांदा बटाटा, फळ , भाजी, किराणा दुकान, धान्य अशी पाच मार्केट आहे. या पाच मार्केटमध्ये कांदा बटाटा मार्केटची गेल्या दोन –अडीच दशकापासून धोकादायक अवस्था आहे. सिडकोने या मार्केटचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे केल्याने मार्केट सुरू होताच काही वर्षांमध्येच स्लॅप कोसळणे, लोखंडी सळ्या बाहेर येणे, तडे जाणे, वाळू गळणे अशा प्रकाराचा सामना मार्केटमधील बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, माथाडी, मापाडी, पालावाल, मेहता, खरेदीदार, शेतकरी यांना करावा लागला आहे. अडीच दशके मार्केट धोकादायक अवस्थेत असतानाही राज्य सरकार मार्केट पुनर्बांधणीबाबत काहीही करत नाही, ही शोकांतिका व संतापजनक बाब असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी म्हटले आहे.
या मार्केटमधील घटकांना आज जीव मुठीत ठेवून वावरावे लागत आहे. नवी मुंबई महापालिकेनेही मार्केट धोकादायक करून आज २० वर्षांचा कालावधी लोटला तरी मार्केटमध्ये व्यवहार होत आहेत. गाळ्यांची अवस्था धोकादायक आहे. अनेकदा दुर्घटनाही घडल्या आहेत. मोठी दुर्घटना झाल्यावर सरकार पुनर्बांधणीबाबत निर्णय घेणार आहे का? मार्केटमध्ये पडझड झाल्यास बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, माथाडी, मापाडी, पालावाल, मेहता, खरेदीदार, शेतकरी यांच्या जिविताला धोका निर्माण होवू शकतो. समस्येचे गांभीर्य पाहता, ही दुर्घटना टाळण्यासाठी आपण संबंधितांना या मार्केटच्या पुनर्बांधणीबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.