जयेश रामचंद्र खांडगेपाटील याजकडून : Navimumbailive.com@gmail.com
जुन्नर : आर्वी येथील शिवनेरी विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक थोरात सर होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक आर्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे होते.
गणेश दिवेकर, मनू अण्णा गावडे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण गाढवे, अरविंद डोंगरे तसेच शाळेचे व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अर्चनाताई गाढवे या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमास नारायणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय शेलार, आर्वी गावचे पोलीस पाटील खुडे यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी थोरात मॅडम, तोडकर सर, घाडगे सर, पिंगट सर, गरकळ सर, घोडेकर मॅडम, ठाणगे मॅडम, घायवट सर, कुमकर सर आदींनी खूप परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
यात या कार्यक्रमांमध्ये एपीआय शेलार यांनी मुलांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. ते यावेळी म्हणाले की, माझे शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील मुले शारीरिक फिटनेस स्टेज डेरिंग, सर्व गुण संपन्न असतात व तीच मुले ८० ते ९० टक्के एमपीसी यूपीसी परीक्षेत उत्तीर्ण होतात संस्कृती कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांनी मुलांचे कौतुक केले व शिक्षकांचे आभार मानले.