नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात विक्रम बार ते समाज मंदिरापर्यतच्या मार्गावर झालेल्या डांबरीकरण कामाची चौकशी करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नेरूळ सेक्टर सहा परिसरात विक्रम बार ते समाज मंदिरापर्यत डांबरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यावर खड्डे अथवा खोलगट भाग असेल त्या ठिकाणी हे डांबरीकरण करण्यात येत आहे. तथापि हे डांबरीकरण वरववर केले जात असून ते काही दिवसात (पॅच) उखडले जाण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळ्यात पहिल्या १५ दिवसातच या डांबरीकरणाचे तीन तेरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरू असलेल्या डांबरीकरण कामाची चौकशी पालिका पातळीवर करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.