नवी मुंबई : मध्यंतरी धाराविच्या समस्यांबाबत मोर्चा काढण्यात आला, पुढे त्याचे काय झाले? अदानीकडून कुठला तुकडा मिळाला की त्याच्या मोर्चाच्या मागण्यांबाबत आपले शिल्लक सेनाप्रमुख व आपण ब्र सुद्धा काढत नसल्याचे सांगत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेचे नेते व विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर हल्लाबोल चढविला.
राज ठाकरे व अमित शहा यांच्या भेटीबाबत उबाठाकडून जोरदार टीका होत असताना गजानन काळे यांनी अंबादास दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
अंबादास दानवे तुम्ही विश्वप्रवक्त्यांची काय साफसफाई करून विरोधी पशनेते झालात, हे सर्वांनाच माहिती आहे.तुमचे शिल्लक सेनाप्रमुख शेपूट घालून दिल्लीश्वरापुढे हिंदूत्वाबाबत ब्रसुद्धा काढू शकले नाहीत. सिल्व्हर ओकच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी आदरणीय राजसाहेबांबद्दन न बोलले बरे. आपल काहीतरी ससंभाजीनगरमधून उमेदवारीचे होते का ते पाहा मग बोला. आमच्या भानगडीत पडू नका, या शब्दांत गजानन काळे यांनी अंबादास दानवे यांना इशारा दिला आहे.