स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीत, त्यामुळे त्यांची आठवण येते. पाठिंबा दिला त्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानतो. मनसेने माझ्यासाठी भव्य सभा आयोजित केली. मनसेची सभा आणि उबाठा गटाची सभा हा योगायोग आहे. उबाठा म्हटले की उलटी आल्यासारखे वाटते. मनसे आणि माझे जवळचे संबंध आहेत. मला मत म्हणजे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे. चांगल्याला चांगले म्हणायची वृती राज ठाकरेंकडे आहे, असे महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे म्हणाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राणेंच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. ही सभा शिर्के हायस्कूल मैदान येथे पार पडली.
नारायण राणे म्हणाले, जो माणूस आवडत नाही त्याबद्द्ल प्रश्न विचारले जातात. मोदींनी जगाच्या अर्थ व्यवस्थेत भारताला पुढे आणलं. मोदींची कामाची आणि निर्णय घेण्याची पद्धत देशाच्या हिताची आहे. ही सगळी धोरण राज ठाकरेंना आवडली म्हणून त्यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा दिला. निवडून आलो तर सांगाल ती कामे वर्षाच्या आत करण्याची माझी क्षमता आहे.
मनसैनिक आणि माझ्यात काही फरक मानत नाही. भविष्यात हाक मारा ओ दिल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांच्यासोबत माझे राजकारणापलिकडचे आहेत. बाजूच्या सभेत विचारवंत काय बोलतात यासाठी कार्यकर्ता पाठवला होता. मोदींवर टीका, शाहांवर टीका केली. खोके खोके बोलता तर मी मातोश्रीवर बोके सोडलेले नाहीत. माझ्या एवढे मातोश्री कोणाला माहित नाही. वेळ आली तर सगळे काढेन. मोदींवर बोलला तर रस्ते बंद करेन, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला. उध्दव विकृत माणूस आहे. दुसऱ्याच चांगलं पाहवत नाही. चाळीस वर्षे सोबत होतो. उध्दवनी महाराष्ट्राची लाज घालवली. जीडीपीच्या प्रश्नावर उध्दव निरुत्तर झाले होते. कोकणात आग लावायला आलेत. काही द्यायला आलेले नाहीत. दोन्ही जिल्ह्यातील गावे आणि तालुके माहित नाहीत, असेही नारायण राणे यांनी सांगितले.