अनंतकुमार गवई
नवी मुंबई : माजी आमदार व नबी मुंबई भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ प्रभाग क्रमांक ९६/९७ मध्ये नवी मुंबई भाजपा चिटणीस गणेश भगत व समाजसेवक संजय पाथरे यांच्या वतीने रविवारी नेरूळ सेक्टर १६ ए मधील जीवन ज्योती आशालय आश्रम मधील मुलांना धान्य वाटप करण्यात आले.
नेरूळ परिसरातील रिक्षा चालक आणि साफ सफाई कर्मचारी यांना छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ समाजसेवक अनिल हेलेकर, दिलिप राऊत, पांडुरंग बेलापुरकर,अशोक पिंगळे, विकास तिकोणे, सागर मोहिते, अशोक गांडाळ, रुणाल सुर्वे, रविंद्र भगत उपस्थित होते.