स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दहीहंडीचा सराव करणाऱ्या गोविंदाला केवळ शाब्दिक सांत्वन न करता सव्वा लाख रुपयांची आर्थिक मदत नवी मुंबई भाजपाकडून देण्यात आली आहे.
दहीहंडीचा सराव करताना नेरूळ सेक्टर आठमधील प्रेम डाफळे हा गोविंदा चौथ्या थरावरुन खाली पडून जखमी झाला. त्यास उपचारासाठी सानपाडा येथील एमपीसीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी भाजपाचे स्थानिक नेते गणेश रसाळ यांनी ही बाब भाजपाचे जिल्हा महामंत्री व माजी नगरसेवक सुरज पाटील तसेच नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संदीप नाईक यांना संपर्क करत सांगितले. सुरज पाटील यांनी तात्काळ २५ हजार रुपयांची तातडीची मदत त्याच दिवशी दिली. भाजपा जिल्यहाध्यक्ष संदीप नाईक यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी प्रेम डाफळे यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. संदीप नाईक यांनी तात्काळ प्रेम डाफळे यांच्या उपचारासाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. तोच मदतीचा धनादेश गणेश रसाळ यांनी सुरज पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक महिलांच्या हस्ते प्रेम डाफळे यांच्या घरी जात त्यांच्या आईवडीलांच्या स्वाधीन केला. नवी मुंबई भाजपाकडून प्रेम डाफळे याला सव्वा लाख रुपयांची तातडीची मदत उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आली. यामागे भाजपाचे स्थानिक नेते गणेश रसाळ यांच्या धावपळीने व प्रामाणिक वृत्ती, जनसामान्यांप्रती कळकळ यांनी महत्वाची भूमिका बजावली.