आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून २० लाख रुपये खर्च करुन उभारणी
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सीबीडी कोकण भवन ब्रिज खालून एस.टी. परिवहन महामंडळाच्या व खाजगी बसेस सायन पनवेल महामार्गा वरून पुणे, सातारा, कोल्हापूर, कात्रज असा विविध ठिकाणी दररोज प्रवास करीत असतात. परंतु सायन पनवेल महामार्गावरील ठाणे तालुक्यातील सीबीडी कोकण भवन बस स्थानकावर प्रवासी निवारा शेड नसल्याने येथील प्रवाशांना आपल्या लहान मुलांना घेऊन उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात सतत उभे राहावे लागत होते त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता याच अनुषंगाने प्रवासी निवारा शेड उभारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत होती. त्यामुळे सोमवारी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधी मधून २० लाख रुपये खर्च करून सीबीडी बेलापूर येथील सायन पनवेल महामार्ग शेजारी (ब्रिज खाली) बसण्याची व्यवस्था व प्रवासी निवारा शेड उभारून त्याचे लोकार्पण ज्येष्ठ नागरिक प्रभाकर कांबळे व बलबीरसिंग चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, सीबीडी, बेलापूर, आग्रोली व विविध परिसरातील गावांतील प्रवासी याच ठिकाणाहून ये-जा करीत असतात. तसेच नवी मुंबई शहरातील प्रवासी व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी रोज पुणे, सातारा, बुलडाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, नागपूर, धुळे, येथे दररोज व्यापारासाठी व कामानिमित्त गावी तसेच विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी ये-जा करीत असतात. परंतू, या ठिकाणी प्रवासी शेड नसल्यामुळे प्रवाशांना एखादा आसरा शोधत थांबून बसची प्रतिक्षा करावी लागत होती त्यामुळे आज या प्रतिक्षेला पूर्णविराम लागल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून एस.टी.चालक व वाहक यांनी ही आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी भाजपा जिल्हाध्यक्ष सी.व्ही.रेड्डी, विनय गोपाळराव गायकवाड ,बंडू मोरे, हस्तीमल जैन, नानजी भाई, संजय ओबेरॉय, जयदेव ठाकूर, अंशू पालांडे, माणिक गायकवाड, जयराम पासवान, अजय वर्मा, गणेश इंदोरे, ढोरे साहेब, बागले साहेब, किशन राठोड, निलेश पाटील, जाधव, गावडे, देविका करपे, शकुंतला गावित, मनीषा जाधव, शीतल गांधी, माधुरी यामा, सारिका राठोड, विद्या सावरकर, चैताली ठाकूर, सुमन बामणकर, अलका कामत, देवयानी मुकादम, मीना ओझा तसेच असंख्य महिला व प्रवासी नागरिक उपस्थित होते.