स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : भाजपा नेरूळ प्रभाग क्रमांक ९६/९७ पुरस्कृत यंगस्टार मित्र मंडळ आयोजित नानाची मानाची हंडी २०२४ नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. नेरूळ सेक्टर १६ मधील श्री गणेश मैदानात सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत हा दहीहंडी उत्सव हजारो गोविंदाप्रेमींच्या सहभागाने जल्लोषात साजरा झाला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. संदीप नाईक यांच्या हस्ते हंडीचे पूजन, टी शर्ट अनावरण, गोविंदा पथकास पुरस्कार देण्यात आले. भाजपाच्या माजी नगरसेविका रुपाली किस्मत भगत आणि नवी मुंबई भाजपा चिटणीस गणेशदादा भगत,समाजसेवक संजय पाथरे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.
जिजा माता महिला गोविंदा पथक, काळाचौकी,अमर ज्योत महिला गोविंदा पथक, चेंबूर, श्री दत्ता महिला गोविंदा पथक, चेंबूर, श्री गणेश महिला गोविंदा पथक, वडाळा,आई एकविरा महिला गोविंदा पथक, वडाळा,चंद्रोदया महिला गोविंदा पथक, प्रभादेवी, शिवशंभो महिला गोविंदा पथक, जुईनगर ही महिला गोविंदा पथके या उत्सवात सहभागी झाली होती. याशिवाय नवी मुंबई परिसरातील ४५ पुरुष गोविंदा पथके या उत्सवात सहभागी झाली होती.
महिला गोविंदा पथकांनी महिला सन्मान व स्त्री रक्षणचे फलक दर्शवत चांगला संदेश दिला. यंगस्टार मित्र मंडळाच्या १०५ सदस्यानी दही हंडी उत्सव साजरा करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. कार्यक्रमामध्ये भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, सुजाता पाटील, लता मढवी, सायली शिंदे, उषा भोईर, युवा नेते वैभव नाईक, महामंत्री सूरज पाटील, समाजसेवक राजेंद्र धनावडे,राजू तिकोणे,नाना घोगरे,संजय सकपाल,भरत सकपाल,सचिन लवटे,राहुल गायकवाड़,अक्षय पाटिल,शैलेश भोईर,बी जी कुंभार,अशोक पिंगळे, संदीप पटकारे, नितिन मराठे, सुरेश ठाकुर,रंगनाथ बारवे,संतोष शिंदे,राजू तुरे,अरविंद जगदाले,मिलिंद पवार,दिंगबर वायकर,दिलीप राऊत,गोरक्षनाथ गांडाळ,दिपक ख़रटमोल,विलास विधाते,दिलीप म्हस्के,विनोद चालके,रमेश नार्वेकर,वासुदेव पाटिल,सुनील वायकर,अरविंद पिसाळ,सोपान शिंदे,प्रवीण पाटिल
समाजसेविका, छाया चव्हाण, विमल गांडाळ, सुनीता निमसे, जासमीन चव्हाण, नाजुका पाबले, रीता विश्वकर्मा, आरती मोढे, कोमल तांडेल, सोनाली साठे, उर्मिला शिंदे, साहिली परशेट्टे, शिला बाणखेले, सुनिता कारंडे, संजीवनी बागकर, सुनीता जूनघरे, छाया सालुंखे, वैशाली फडके,स्वाती परब उपस्थित होते.