सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : समाजात महिलावरील वाढते अन्याय, विनयभंग, लैंगिक शोषण, अत्याचार याविरोधात नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी नेरूळ सेक्टर दोनमधील कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालयासमोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवात स्थानिक विभागातील महिला व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या दहीहंडी उत्सवात महिला अत्याचाराचे पोस्टर हंडीला बांधून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. महिलांनी ही दहीहंडी फोडली. यावेळी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत, बाबुराव ठाकूर, कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना दहीहंडीच्या आयोजक विद्या भांडेकर यांनी राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत राज्यातील महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरलेल्या महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यात दररोज महिलांवर, मुलींवर अन्याय, अत्याचार, व्याभिचाराच्या बळी, लैंगिक शोषण या घटनांमध्ये दिवसेंगणिक वाढ होत आहे. महिला, मुली समाजात कोठेही अगदी घरी, शाळेत सुरक्षित राहील्या नाहीत. नराधमांना कायद्याचा धाक राहीलेला नाही. त्यामुळे महिलांनी, मुलींनी अबला न राहता स्वत:चे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेऊन सबला बनण्याची वेळ आली असल्याचे विद्या भांडेकर यांनी यावेळी सांगितले.