आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची भूमिका ठरली महत्वाची
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विकास निधीमधून नवी मुंबईमध्ये विविध प्रकारच्या नागरी विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन हे धूमधडाक्यात सुरु असून बुधवारी वाशी येथील सेक्टर १५ मीनाताई ठाकरे मैदानामध्ये खुला मंच (स्टेज) तोडून त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका निधी व आमदार विकास निधी अंतर्गत २ कोटी २६ लाख उपलब्ध करून वाशी येथील नागरिकांकरिता बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन नवी मुंबई महापालिका शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, वाशी सेक्टर १५ येथील नागरिकांची गेल्या काही महिन्यापूर्वी मागणी होती की सदर ठिकाणी खुला मंच असल्याने सदर परिसरातील वसाहतीमधील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्याकरिता लागणारे मंडप भाडे व इतर कार्यक्रमाकरिता लागणारा खर्च हे न परवडणारे होते. त्याच अनुषंगाने आज वाशी येथील नागरिकांना कमी खर्चात सोयी सुविधा मिळाव्या या हेतूने वाशी येथील सेक्टर १५ मीनाताई ठाकरे मैदानामध्ये बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येत आहे. त्यामुळे सदर नागरिकांना एकाच छताखाली विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सदर बहुउद्देशीय इमारत” ही जी+१ उभारणे प्रस्तावित असून तळमजल्यावर बहूउद्देशीय स्टेज, चेजिंग रुम, एक स्टोअर रुम व शौचालय असणार असून पहिल्या मजल्यावर Rereational Hall, 2 Changing व शौचालय उभारण्यात येणार आहे. तसेच बहुउद्देशीय इमारतीमध्ये स्थापत्य व विद्युत विषयक कामेही होणार आहे. त्यामुळे येत्या लवकरच वाशी येथील नागरिकांसाठी सर्व सुविधायुक्त अशी बहुउद्देशीय इमारत उभी राहत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाले असून स्थानिक माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी पत्रकार माध्यमांशी बोलतांना आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानत त्यांचे कौतुक केले आहे.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेविका माधवी शिंदे, माजी नगरसेविका रत्ना विश्वासराव, अंजली शिंदे, मुकुंद विश्वासराव, विक्रम पराजुली, विकास सोरटे, प्रमिला खडसे, मालती सोनी, राजू तिकोने, प्रताप भोसकर, रामकृष्ण अय्यर, ज्येष्ठ नागरिक पी.डी. चौधरी सर आणि सहकारी, तसेच महापालिका अधिकारी कार्यकारी अभियंता अजय संखे, कार्यकारी अभियंता विद्युत संजीव पाटील, उप अभियंता संतोष चौधरी, उप अभियंता तानाजी शिंदे, विभाग अधिकारी सागर मोरे तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.