सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने पार पडलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेचा २९ ऑगस्ट रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत बक्षीस समारंभ पार पडणार आहे. या पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलात्मकतेला मोठे व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये ६० शाळांमधील पाच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन गट अशा गटांमध्ये घेण्यात आली. भारतीय सण उत्सव, स्वच्छ भारत अभियान नवी मुंबई, माझे आवडते उद्यान, नवी मुंबईतील आगरी कोळी संस्कृती, नवी मुंबईतील एक प्रेक्षणीय स्थळ, भारतीय सण उत्सव, नवी मुंबईतील जैवविविधता, नवी मुंबई मेट्रो आणि नवी मुंबईचे पर्यावरण संवर्धन असे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम तसेच चषक बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सहभागी शाळांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक वर्ग आणि कलाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.