अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : झाडावरील किड्यांपासून होणाऱ्या त्रासातून जुईनगर सेक्टर २४ मधील रहीवाशांची सुटका करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
जुईनगर सेक्टर २४ मधील रहीवाशी, दुकान व्यावसायिक किड्यांच्या त्रासापासून गेली काही दिवस त्रस्त झाले आहेत. हे किडे झाडावर असून हे किडे अंगावर बसल्यास खाज सुटणे, पुरळ उठणे आदी व्याधींचा सामना येथील रहीवाशांना व दुकान व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना जुईनगर सेक्टर २४ तसेच पेट्रोलपंप परिसरात औषध फवारणीचे निर्देश देवून स्थानिकांची या समस्येतून मुक्तता करण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.