स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई – नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्याच बरोबर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवणुकामध्ये ही महानगर पालिकेचा मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबईच्या इतिहासामध्ये प्रथम बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये सलग तिसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झालेल्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या समवेत नवी मुंबईच्या विकासासंदर्भात बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये नवी मुंबईमध्ये महत्वपूर्ण होत असलेल्या प्रकल्प संदर्भात आढावा घेतला. तसेच बेलापूर मध्ये होत असलेल्या गोरगरीब जनतेसाठी सुपर स्पेशालिटी मेडिकल हॉस्पिटल व महाविद्यालया संदर्भात विचारणा केली असता सदर प्रकल्पाची प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त यांनी सांगितले. तसेच गेली 20 वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अविरत सेवा बजावत असलेले स्थानिक प्रकल्पग्रस्त कर्मचारी यांना कायमस्वरूपी करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्त कर्मचारी यांना योग्य तो न्याय देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्याच बरोबर सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकां करिता गार्डन व इतर सुख सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच त्यापुढे म्हणाल्या की, नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे “परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांचा पुतळा उभारणे, तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड संदर्भात, न.मुं.म.पा मार्फत शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्र व संक्रमण कँम्प उभारणेबाबत, जुईनगर येथील ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्रासाठी जागा उपलब्ध करणे, तुर्भे विभागात बाल माता रुग्णालयास मंजुरी देण्याची मागणी व तुर्भे वार्ड क्रं 73 डॉ आंबेडकर नगर व गणेश नगर सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी मोरबे धरणाचे पाणी मिळावे यासाठी मागणी केली, गावठाण विस्तार, प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करणे, गावठाणामधील जीर्ण झालेल्या घरांना पुनर्बांधणी करणे संदर्भात परवानगी देणे, वाशी येथे पाण्याच्या टाकीत पडून मृत्युमुखी पडलेल्या लहान मुलाच्या आई वडिलांना योग्य तो न्याय मिळवून दयावे अश्या अनेक विषयांवर डॉ. कैलास शिंदे यांनी सकारात्मक न्याय देण्यात येईल असे सांगितले.
तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी जिल्हाध्यक्ष सी व्ही रेड्डी, माजी नगरसेवक दीपक पवार, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, डॉ. राजेश पाटील, दत्ता घंगाळे, राजू तिकोने, पांडुरंग आमले, राजू शिंदे, सुरेश अहिवळे,ज्ञानेश्वर कोळी, कैलास कोळी, ज्योती पाटील,शैलजा म्हात्रे, विनोद शाह, नाना शिंदे,पुण्यनाथ तांडेल कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.