नवी मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदा हि बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून तुर्भे येथील हनुमान नगर रहिवासांसाठी “हनुमान मंदिर” येथे “महाप्रसादाचे” आयोजन करण्यात आले होते.
या सदर “महाप्रसाद” कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुर्भे हनुमान नगर येथील नागरिकांकरिता दरवर्षीप्रमाणे एक विशेष कार्यक्रम म्हणून “महाप्रसादाचे” आयोजन केले जात असल्याने सदर तुर्भे हनुमान नगर परिसरात एक उत्साह तसेच आनंदमय वातावरण निर्माण होत असतो. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते हनुमानाची पूजा अर्चा करून आरती झाली व हनुमानाला पंचपक्वान व लापशीचा भोग चढवून “महाप्रसादाला” सुरुवात केली. तसेच तुर्भे हनुमान नगर परिसरातील असंख्य नागरिक व महिलांनी “महाप्रसादाचा” लाभ घेतला.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी, संगीता सुतार, जनार्धन सुतार, सुरेश अहिवले, रामदीप हलवाई, सुरेश गायकवाड, प्रविण चिकने, सुवर्णा चिकने तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.