कॉंग्रेस जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांची मागणी
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २, ४ आणि जुईनगर सेक्टर २३, २४ परिसरातील अंधूक प्रकाश देणाऱ्या पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे आणि नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २,४ आणि जुईनगर सेक्टर २३, २४ परिसरातील पथदिव्यांची दुरावस्था झाली असून या पथदिव्यातून अंधूकसा प्रकाश येत आहे. त्यामुळे या परिसरातील बाह्य व अंर्तगत रस्त्यावर प्रकाशाची समस्या निर्माण झाली असून कमी उजेडामुळे पथदिवे केवळ नामधारी बनले आहेत. अंधूक प्रकाशामुळे सांयकाळनंतर वाटमारीची, लुटमारीची, चेन स्नॅचिंग, छेडछाड अथवा त्याहूनही विचित्र घटना घडण्याची भीती आहे. सेक्टर दोनमधील एलआयजी परिसरात तर सांयकाळनंतर अंधारच पहावयास मिळतो. या पथदिव्यांची तपासणी करुन पथदिव्यातील बल्ब तातडीने बदली होणे आवश्यक आहे. पथदिव्यांसोबत त्यातील बल्बही नादुरुस्त झाले आहे. या सर्व सदोष पथदिव्यातील बल्ब बदलून अंधाराची, अंधूक प्रकाशाची समस्या कायमस्वरुपी नष्ट होईल. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना पथदिव्यातील बल्ब बदली करण्याचे निर्देश देऊन स्थानिक रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.