संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई (प्रतिनिधी) : सानपाडा येथील साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने कै. दिनेश विठ्ठल आमले यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक २०२५ साईभक्त प्रीमियर लीगचे आयोजन सेक्टर ८ मधील बाबू गेनू मैदानावर आयोजन करण्यात आले होते. प्रकाशझोतात झालेल्या या स्पर्धेत संघमालक शारदा पांडुरंग आमले यांच्या साईभक्त ब्लास्टर सेक्टर ७ या संघाने स्पर्धेतील विजेतेपद पटकावले तर संघमालक सुनील कुरकुटे यांच्या साईभक्त रायडर्स सेक्टर १० या संघाने स्पर्धेतील उपविजेतेपद पटकावले आणि संघमालक ब्रम्हानंद शेळके यांच्या साईभक्त हिरोज सेक्टर ८ या संघाला तिसऱ्या क्रमाकांवर समाधान मानावे लागले.
या क्रिकेट सामन्यासाठी सानपाडा विभागातील सर्व सेक्टर मधून प्रत्येकी दोन संघ अशा संकल्पनेतून एकूण १८ संघांचे क्रिकेट सामने घेण्यात आले होते. यामध्ये सुनील कुरकुटे, राजेश ठाकूर, आबा जगताप, शैला पाटील, शिरीष पाटील, भावेश पाटील, सुधीर आंग्रे, ब्रह्मानंद कळके, अशोक विधाते, विश्वास बोराडे, विसाजी लोके, चिंतामण बेल्हेकर, पांडुरंग आमले, शारदा आमले व अथर्व आमले हे होते. स्पर्धेचे उद्घाटन बेलापूर विधानसभेच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा पाहण्यासाठी भाजपाचे बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, अखिल भारतीय माथाडी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय बुवा कुलकर्णी, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, सुनील कुरकुटे, शिरीष पाटील, विश्वास बोऱ्हाडे, भावेश पाटील, विसाजी लोके, विकास गाढवे अविनाश जाधव, गणेश पावगे, राजेश ठाकूर, देवा चोरगे, अजय पवार, विश्वास कणसे, गणेश पावगे, विठ्ठल गव्हाणे, श्रीपाद पत्की, चिंतामणी बेल्हेकर, एपीआय विजय चव्हाण, अशोक विधाते, ब्रह्मानंद कळके, सुधीर आंग्रे, रमेश शेटे, अविनाश टेमकर, अशोक ठसाळ, जितेंद्र खांडके, नवनाथ सुतार, जयराम खरात, सुनील नाईक, चंद्रकांत सरनौबत, शशी नायर, पंकज दळवी, प्रफुल्ल शिंदे, वसंत बावकर, नानाजी शिंदे, संजय घोगरे, पूजा घोगरे, तानाजी जाधव, राय दत्त लोंडगे, रायबा गावकर, वाफारे, सागर वारुंगसे, गणेश मानकर, बाबासाहेब चितळकर, यशवंत कुपेकर, नितीन भोसले, राकेश नाईक सहभागी झाले होते. स्पर्धा आयोजनसाठी व वाढदिवसानिमित्त भाजयुमोचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आवेश फारुकी, उत्कृष्ट गोलंदाज विवेक भगत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ओंकार काबुगडे आणि मालिकावीर ओमकार टोणपे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम २१००० व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम १५००० व आकर्षक ट्रॉफी, तृतीय पारितोषिक रोख रक्कम ७५०० व आकर्षक ट्रॉफी देण्यात आले.