• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 3, 2025

आंदोलनाच्या सांगतेनंतर रात्रीपासून पहाटेपर्यंत महापालिकेची स्पेशल ‍क्लिनींग ड्राईव्ह

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आंदोलनाच्या सांगतेनंतर रात्रीपासून पहाटेपर्यंत महापालिकेची स्पेशल ‍क्लिनींग ड्राईव्ह

सिडको एक्झिबिशन सेंटर व परिसराची सखोल स्वच्छता – नागरिकांकडून प्रशंसा

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : मुंबईमध्ये सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक मोठया संख्येने नवी मुंबईमध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर व इतर ठिकाणी थांबलेले होते. ०२ सप्टेंबर रोजी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर हे नागरिक आपापल्या गावांकडे परतले. राज्याच्या इतर भागांतून एकाच वेळी इतक्या मोठया संख्येने नागरिक नवी मुंबईमध्ये आल्याने शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने दैनंदिन स्वच्छता कार्यात या भागात विशेष स्वच्छता पथके तैनात करण्यात आली होती.

आंदोलनाची सांगता झाल्यानंतर आयुक्तांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून २ सप्टेंबर रोजी रात्रीपासून पहाटे ४ वाजेपर्यंत या भागात स्पेशल क्लिनींग ड्राईव्ह राबविण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सिडको एक्झिबिशन सेंटर व त्याचा परिसर तसेच सेक्टर ३० वाशी आणि तुंगा हॉटेल आसपासचा परिसर आणि सायन पनवेल हायवे परिसर याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहीमेत १०० हून अधिक स्वच्छताकर्मी, स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक तसेच २ यांत्रिकी सफाई मशीन, ३ सिव्हरेज जेटिंग मशीन तसेच कचरा संकलन व वाहतूक करणारी वाहने यांच्या माध्यमातून २१ टन इतक्या मोठ्या संख्येने कचरा संकलीत करण्यात आला व तुर्भे येथील प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.

आंदोलन संपल्यानंतर तत्परतेने रात्रीच ही विशेष मोहीम हाती घेऊन पहाटे ४ पर्यंत अथक काम करुन दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगविण्यापूर्वीच हा संपूर्ण परिसर नेहमीसारखा स्वच्छ केल्याने त्या परिसरात मॉर्निंग वॉकला तसेच कामासाठी जाणाऱ्या नागरिकांकडून महापालिकेच्या तत्पर स्वच्छता कार्याची प्रशंसा करण्यात आली.

Previous Post

चुन्यापासून बनवलेला राजवाडा व चिनी मातीपासून बनवलेला बालगणेशाचा पर्यावरण पूरक देखावा

Next Post

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता : कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

Next Post
कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता : कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता : कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्यचे संकलन

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्यचे संकलन

सिडकोच्या मेट्रो सेवेवर प्रवाशांच्या पसंतीची मोहर

सिडकोच्या मेट्रो सेवेवर प्रवाशांच्या पसंतीची मोहर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com