• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 7, 2025

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्यचे संकलन

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्यचे संकलन

जयेश खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com

जुन्नर (प्रतिनिधी) : अनंत चर्तुदशीच्या दिनी गावोगावी गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य संकलनाचे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही जुन्नर तालुक्यात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून शनिवारी उत्साहात पार पडला. जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळगावतर्फे नारायणगाव, जुन्नर, ओतूर, आळेफाटा, उदापूर, राजूरी, नारायणगाव, व इतर ठिकाणी निर्माल्य संकलनाचे कार्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून भक्तिभावाने राबविण्यात आला.

सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेमध्ये पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील मीना नदीच्या काठावर गणेश विसर्जन करण्यात आले. पिंपळगाव तर्फे नारायणगावमध्ये गेली पाच वर्षे निर्माल्य संकलनाचे कार्य करण्यात येत आहे. केवळ पिंपळगावातीलच नाही तर शेजारच्या गुंजाळवाडीमधीलही घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी पिंपळगावातील मीना नदीकडे आणण्यात आल्या होत्या. ४०० हून अधिक घरगुती गणेशमूर्तीचे व २५ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलनासाठी उद्धव वऱ्हाडी व बाळासाहेब वाणी यांच्याकडून दोन टॅक्ट्रर टॉली उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. क्रांतीवीर मित्र मंडळाच्या माध्यमातून घरगुती व सार्वजनिक गणेशविसर्जन विसर्जनस्थळी नेण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली उपलब्ध करुन देण्यात आली होती. माजी सरपंच पंकज वऱ्हाडी यांनी नदीकडे जाणाऱ्या मार्गाची जेसीपी मदतीने सफाई करुन दिली होती. पिंपळगावचे उद्योजक सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम फांऊडेशनच्या माध्यमातून विर्सजनस्थळी टेबल उपलब्ध करुन देण्यात आले, कनात बांधण्यात आली. विर्सजनासाठी आलेल्या गणेशमूर्तींच्या विर्सजनामध्ये सचिन चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी योगदान दिले. श्री सदस्यांनी विसर्जनस्थळी बारा तास निर्माल्य गोळा केले. अंदाजे पाच टनाहून अधिक निर्माल्य यावेळी पिंपळगावमध्ये जमा झाले. या जमा झालेल्या निर्माल्याचे कंपोस्ट खत बनवून वृक्षारोपणाच्या ठिकाणी ते वापरण्यात येणार आहे. या विसर्जनस्थळी पिंपळगावच्या सरपंच सौ. माधुरी वऱ्हाडी, गावच्या सोसायटीचे चेअरमन पांडूरंग खांडगेपाटील, माजी चेअरमन राजेश खांडगेपाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण वऱ्हाडी,निलेश चव्हाण, राहूल गावडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता : कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

Next Post

सिडकोच्या मेट्रो सेवेवर प्रवाशांच्या पसंतीची मोहर

Next Post
सिडकोच्या मेट्रो सेवेवर प्रवाशांच्या पसंतीची मोहर

सिडकोच्या मेट्रो सेवेवर प्रवाशांच्या पसंतीची मोहर

‘सुखकर्ता’वर कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष!

‘सुखकर्ता’वर कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष!

मराठा आरक्षणाची इतरांना पोटदुखी कशासाठी?

मराठा आरक्षणाची इतरांना पोटदुखी कशासाठी?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com