• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2025

मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरीविरोधात ठामपणे लढणार : शिवराज मोरे

adminbyadmin
in मुंबई
0
मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरीविरोधात ठामपणे लढणार : शिवराज मोरे

सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : संघटन मजबूत करून तरुणांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात संघर्ष करणार असून मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरी विरोधातही युवक काँग्रेस ठामपणे लढणार आहे, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केला आहे.    

मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. या बैठकीला भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी अजय छिकारा, प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक अध्यक्ष शिवराज मोरे, सहप्रभारी नवज्योत सिंग संधू जी, शाम्भवी शुक्ला जी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मागील काळातील कामगिरीचा आढावा घेत, आगामी काळातील युवक काँग्रेसच्या कामकाजाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. 

यावळी बोलताना प्रभारी अजय छिकारा म्हणाले की, महाराष्ट्र युवक काँग्रेसने बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्याचे काम हाती घेतले आहे. मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरीविरोधात युवक काँग्रेस लढा देईल. हा लढा लोकशाही मजबूत करण्यासाठी आहे.

या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने मतदार यादीतील गोंधळ व मतचोरीच्या विरोधात लढा उभारण्याचा ठाम निर्धार केला. राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बूथ स्तरावर मतदार यादीची तपासणी करून मतदारांना न्याय देण्यासाठी सज्ज होतील. पुढील एक महिनाभर महाराष्ट्र युवक काँग्रेस बूथवार मतदार यादीवर काम करून, आवश्यक माहिती गोळा करून पुढील रणनीती आखणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले. यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती युवक काँग्रेसच्या मीडिया विभागाचे चेअरमन अक्षय जैन यांनी दिली आहे. 

Previous Post

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विनोबा भावे यांना अभिवादन!

Next Post

उरण तालुक्यात जमीन खरेदी व्यवहारांमध्ये दस्त नोंद घालण्यासाठी खोट्या शेतकरी दाखल्यांचा वापर.

Next Post
उरण तालुक्यात जमीन खरेदी व्यवहारांमध्ये दस्त नोंद घालण्यासाठी खोट्या शेतकरी दाखल्यांचा वापर.

उरण तालुक्यात जमीन खरेदी व्यवहारांमध्ये दस्त नोंद घालण्यासाठी खोट्या शेतकरी दाखल्यांचा वापर.

नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा डब्बे देण्याची राष्ट्रवादीची मागणी

नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा डब्बे देण्याची राष्ट्रवादीची मागणी

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना प्राप्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना प्राप्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com