स्वयंम न्यूज फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पशू जन्म नियंत्रण कार्यक्रम कायदयाची अंमलबजावणी सुरु असून त्यानुसार नवी मुबई महानगरपालिका शहरातील भटक्या श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण करणेकरिता सन २००६ पासून तुर्भे येथील श्वान नियंत्रण केंद्र कार्यरत आहे. तसेच पाळीव श्वानांना विभाग कार्यालयांमार्फत श्वान परवाने देण्याची कार्यवाही करण्यात येते. त्या अनुषंगाने सर्व पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना प्राप्तीसाठी nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाची SUO MOTO WRIT PETITION (CIVIL) No.5 of 2025 अन्वये दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजीच्या आदेशान्वये, महाराष्ट्र शासनाचे मार्गदर्शक सुचनांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचे हद्दीमध्ये ज्याप्रमाणे प्राण्यांचे संरक्षण करणे क्रमप्राप्त आहे, त्याचप्रमाणे प्राणीप्रेमींना कायदयान्वये जी काळजी घ्यावयाची त्याचीही अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात भटक्या श्वानांचे चावणे, मागे लागणे, लहान मुलांना भिती वाटणे याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत.
त्या अनुषंगाने, श्वानांच्या काही जाती जसे की, रोटविलर्स (Rottweilers), पिट बूल (Pit bull), जर्मन शेफर्ड (German Shepherd), डोबरमन (Dobermann) व इतर जातीच्या कुत्र्यांचे पालन / पैदास केले जात असल्याच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहेत. अशा प्रकारच्या श्वानांचा स्वभाव हा अत्यंत हिंस्त्र असतो, अशा जातीच्या श्वानांना रस्त्यावर फिरायला सोडल्यास त्यांच्यापासून इतरांच्या जीवाला धोका होऊ शकतो.
तरी सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, वरील जातींच्या सह सर्व जातींच्या पाळीव श्वानांना योग्य ते लसीकरण केलेले असावे. त्यांना घराबाहेर घेऊन जातांना चेन / बेल्ट याने बांधून सोबत घेऊन जावे. सोबत स्कूप (सुपली) तसेच श्वानास त्रास होणार नाही अशा पध्दतीने तोंडाला मझल (Muzzle) लावावा. त्याचप्रमाणे मा.न्यायालयाचे व प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मझल (Muzzle) न लावता कुत्रा फिरवताना आढळल्यास, योग्य ती कायदेशीर दंडात्मक कार्यवाही / कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.



