• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 19, 2025

‘सुखकर्ता’वर जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रभारी यांची बैठक उत्साहात

adminbyadmin
in रायगड
0
‘सुखकर्ता’वर जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रभारी यांची बैठक उत्साहात

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

उलवे, ता. १७ : ‘सुखकर्ता’  येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्ती झालेल्या विधानसभा प्रभारी यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीला कर्जत, उरण, पेण,महाड, खोपोली, माणगांव अलिबाग येथील पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी नवनियुक्त विधानसभा प्रभारी यांनी  आगामी काळात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्याशी विचारविनिमय करून काॅंग्रेस पक्षाची विचारधारा तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी खंबीर भूमिका घ्यावी असे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, “सर्वांना सोबत घेऊन काॅंग्रेस बळकट करण्यासाठी हातात हात घालून काम करायचे आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मी खंबीरपणे आपणा सर्वांच्या पाठीशी उभा आहे. नव्याने नियुक्ती झालेल्या सर्व प्रभारीना  सहकार्य करायचे आहे.”
या बैठकीत जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सर्व आढावा घेऊन पदाधिकारी यांची मते जाणून घेतली.
 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा प्रभारी म्हणून कर्जत विधानसभा -नारायण आंबेकर, (चिटणीस, महाराष्ट्र प्रदेश) उरण विधानसभा- डॉमिनीक डीमेलो. (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश) पेण विधानसभा -मनोज कांबळे,( सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश) अलिबाग विधानसभा – प्रदीप राव, (चिटणीस – महाराष्ट्र प्रदेश )श्रीवर्धन विधानसभा- अशोक मोरे, (चिटणीस महाराष्ट्र प्रदेश,) महाड विधानसभा- सुरेश कातकर (रत्नागिरी) यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी बुधवारी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि ‘परदेश प्रवासाची पंचविशी’ आणि ‘जय शिवराय’ ही पुस्तके भेट देऊन स्वागत केले.
यावेळी उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, कर्जत तालुका अध्यक्ष संजय गवळी, खालापूर तालुका अध्यक्ष देविदास म्हात्रे,माणगांव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे, महाड तालुका अध्यक्ष अफजल चांदले,रोहा तालुका अध्यक्ष सुनिल देशमुख,युवक जिल्हा अध्यक्ष निखिल डवले, खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन,ओबीसी पनवेल अध्यक्ष वैभव पाटील, इंटक जिल्हाध्यक्ष किरीट पाटील,तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

ओपन जीममधील साहित्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीचे पालिका आयुक्तांना साकडे

Next Post

नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी विशेष अभियान राबविण्याची एमआयएमची मागणी

Next Post
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी विशेष अभियान राबविण्याची एमआयएमची मागणी

सानपाडामधील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी भाजपचे पालिकेला स्मरण

सानपाडामधील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी भाजपचे पालिकेला स्मरण

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वर्सोवा वेसावे समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वर्सोवा वेसावे समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com