स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ पामबीच मार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडच्या सुरुवातीलाच असणाऱ्या ओपन जीममधील तुटलेल्या साहित्याची तातडीने दुरुस्ती करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सारसोळे जेटी जंक्शनपासून ते वजरानी स्पोर्टसपर्यत पामबीच मार्गालगत सर्व्हिस रोड आहे. सारसोळे जेटी जंक्शन चौकापासून सुरु होणाऱ्या सर्व्हिस रोडच्या सुरुवातीलाच महापालिका प्रशासनाने ओपन जीमची निर्मिती केली आहे. या सर्व्हिस रोडवर शेकडोंच्या संख्येने रहिवाशी सकाळ व संध्याकाळी चालत असतात. ते या ठिकाणी व्यायामही करत असतात. परंतु गेल्या काही दिवसापासून ओपन जीममधील साहित्य तुटले आहे. मोडकळीस आले आहे, निखळून पडले आहे. त्यामुळे रहिवाशांना या ठिकाणी व्यायाम करता येत नाही. समस्येचे गांभीर्य व नागरिकांची गरज लक्षात घेता आपण संबंधितांना या ठिकाणी असलेल्या साहित्याची दुरुस्ती करण्यास सांगावे अथवा नव्याने साहित्य उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



