स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी भाजयुमोचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी युनियनचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा परिसरात सेक्टर सातमध्ये सेव्हन्थं डेज हायस्कूल व न्यू अवधूत सोसायटीसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहने घेवून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनातील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय त्या रस्त्यालगत असलेल्या पदपथावरुन ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावरही वाहनामुळे पाणी उडून त्यांचे कपडे खराब होत आहेत. या खड्ड्यांमुळे स्थानिक रहिवाशी व वाहनचालकही त्रस्त झाले आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना तातडीने या परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
रस्त्यावरील खड्डे या समस्यानिवारणासाठी मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी निवेदन दिले होते. आपण ते निवेदन संबंधितांना फॉरवर्डही केले होते. तथापि पाच दिवसांमध्ये काहीही कार्यवाही न झाल्याने खड्डे तसेच आहेत. नवरात्रोत्सव आता अवघ्या काही तासांनी सुरु होत आहे. आपण समस्येचे गांभीर्य व स्थानिकांना होत असलेला त्रास पाहता या परिसरातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे आवश्यक आहे. या समस्येचे निवारण करुन स्थानिक रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



