• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 23, 2025

कोपरखैराणेतील लोकमाता अहिल्यादेवी होळकर माता बाल रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कोपरखैराणेतील लोकमाता अहिल्यादेवी होळकर माता बाल रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज

नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर २२ मधील महापालिकेच्या आरोग्य विभागाचे लोकमाता अहिल्यादेवी होळकर माता बाल रुग्णालय बांधून सुसज्ज असून लवकरच प्रशासनाच्या वतीने स्थानिक रहिवाशांच्या आरोग्य सुविधेसाठी त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
कोपरखैराणे सेक्टर २२ मधील प्लॉट ७/८वर महापालिकेने सुमारे २८ ते ३० वर्षांपूर्वी लोकमाता अहिल्यादेवी होळकर माता बाल रुग्णालय सुरु केले. सभोवतलाची सिडको वसाहत व माथाडी वसाहतीला या माता बाल रुग्णालयातून उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधेचा लाभ मिळत असे. पुढे २०१५-१६च्या सुमारास या बांधकामाची दुरावस्था झाल्याने या रुग्णालयाला धोकादायक घोषित करावे लागले. तत्कालीन नगरसेवक व मंत्री गणेश नाईक यांचे निकवटर्तीय सहकारी देविदास हांडेपाटील यांनी स्थानिकांना आरोग्य सुविधेसाठी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात जावे लागत असल्याने या समस्येचे गांभीर्य सातत्याने महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. देविदास हांडेपाटील यांच्या पाठपुराव्यामुळे २०१९ ला माता बाल रुग्णालयाच्या इमारत उभारणीला व कोपरखैराणे सेक्टर १६ मध्ये आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली. ऐरोली विधानसभेचे तत्कालीन आमदार संदीप नाईक यांनीही हांडेपाटील यांच्या पाठपुराव्याला सहकार्य करत रुग्णालय उभारणीसाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला, प्रशासनाला निर्देशही दिले.
२०२० साली कोरोना आल्यामुळे या माताबाल रुग्णालयाचे व नागरी आरोग्य केंद्राचे काम रखडले. स्थानिकाची आरोग्य सुविधेबाबत परवड होत असल्याने श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी माता बाल रुग्णालय व आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी मंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला. तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची श्रीमती सुनिता हांडेपाटील व सुनिकेत हांडेपाटील यांनी २० हून अधिक वेळा भेटी घेत निवेदने सादर केली. श्रीमती हांडेपाटील यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने माताबाल रुग्णालयाच्या व नागरी आरोग्य केंद्राच्या कामाला गती दिली. नोव्हेंबर २०२४ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १६ मध्ये नागरी आरोग्य केंद्राचे लोकार्पण झाले असून रुग्णालयाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. नऊ वर्षांहून अधिक काळ माताबाल रुग्णालय कार्यरत नसल्याने स्थानिक रहिवाशांची गैरसोय झाली. जी प्लस टू अशा धर्तीवर हे रुग्णालय लिफ्टचे काम पूर्ण नसल्याने तसेच आतील रुग्णालयीन मशिन व अन्य साहित्याची अॅरेजमेंट न झाल्याने रुग्णालय सुरु करण्यास विलंब झाला. आता रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून सर्व अंर्तगत कामेही पूर्ण झाली असल्याने लवकरच या माताबाल रुग्णालयाचे लोकार्पण होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Previous Post

अटल सेतूवर पडलेल्या खड्ड्यांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची एमआयएमची मागणी

Next Post

शारदीय नवरात्रोत्सवात महेंद्रशेठ घरत यांनी घेतले पहिल्याच दिवशी वैष्णोदेवीचे दर्शन!

Next Post
शारदीय नवरात्रोत्सवात महेंद्रशेठ घरत यांनी घेतले पहिल्याच दिवशी वैष्णोदेवीचे दर्शन!

शारदीय नवरात्रोत्सवात महेंद्रशेठ घरत यांनी घेतले पहिल्याच दिवशी वैष्णोदेवीचे दर्शन!

सिडकोने २०२४-२५ वर्षाकरिता सादर केला ११ हजार नऊशे दोन कोटींचा अर्थसंकल्प

सिडकोतर्फे प्रकल्पबाधितांना १२.५% योजने अंतर्गत ७९ हजार चौ.मी. क्षेत्राच्या ९८ भूखंडांचे वाटप

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्यामुळे ‘शेरॉन’च्या कामगारांना अकरा हजार रुपयांची पगारवाढ !

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्यामुळे ‘शेरॉन’च्या कामगारांना अकरा हजार रुपयांची पगारवाढ !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com