स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २,४, जुईनगर नोडमध्ये नागरिकांना त्रास देणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २,४ आणि जुईनगर नोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून किड्यांचा उद्रेक वाढला आहे. हे किडे अंगावर बसल्यास खाज सुटणे, पुरळ येणे अशा समस्यांनी स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत.घराबाहेर निघणे, सार्वजनिक ठिकाणी वावरल्यास किडे लगेच अंगावर येतात. या समस्येने स्थानिक रहिवाशी आजारी पडत आहेत. तरी आपण या परिसरात संबंधितांना धुरीकरंण अथवा अन्य उपाययोजना करुन किड्यांचे निर्मूलन करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.



