• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 9, 2025

रायगड जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठका व जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन उत्साहात पार

adminbyadmin
in रायगड
0
रायगड जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठका व जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन उत्साहात पार

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com- ८३६९९२४६४६
उरण :रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ८ व ९ ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या. रोहा, तळा, महाड आणि माणगाव या तालुक्यांतील बैठकीत स्थानिक स्तरावरील पक्ष कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठका यशस्वीपणे पार पडण्यासाठी रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील देशमुख, तळा तालुका अध्यक्ष  शरद भोसले, माणगाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे आणि महाड तालुका अध्यक्ष उमेश तांबे यांनी आपल्या तालुक्यांमध्ये बैठकीचे अत्यंत प्रभावी नियोजन केले.
 दौऱ्यादरम्यान तळा, माणगाव आणि महाड येथे काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः तळा तालुक्यात या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक नव्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून, त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत अल्पसंख्याक विभाग रायगड अध्यक्ष अखलाख शिलोत्री, रायगड काँग्रेस उपाध्यक्ष किरीट पाटील, पनवेल ओबीसी सेल अध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक: अतुल लोंढे

Next Post

तासिका शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश देण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी

Next Post
परिवहन उपक्रमाच्या बसेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

तासिका शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश देण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी

तक्रारदारांची नावे लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

भाजपच्या नवी मुंबई जिल्हा सचिवपदी पांडुरंग आमले

पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिकेस ‘हरित यशोगाथा सर्वांगीण उत्कृष्टता’ पुरस्कार

पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिकेस ‘हरित यशोगाथा सर्वांगीण उत्कृष्टता’ पुरस्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com