• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2025

पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिकेस ‘हरित यशोगाथा सर्वांगीण उत्कृष्टता’ पुरस्कार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिकेस ‘हरित यशोगाथा सर्वांगीण उत्कृष्टता’ पुरस्कार

सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : स्वयंम न्यूज ब्युरो

नवी मुंबई : पाणी, सांडपाणी, घनकचरा आणि पुर्नवापर यासारख्या महत्वाच्या विषयाशी संबधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील IFAT इंडिया २०२५ हे विशेष प्रदर्शन १४ ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात ५० पेक्षा जास्त देशांतील ५०० पेक्षा अधिक उत्पादक सहभागी झाले आहेत.

या आंतरराष्ट्रीय मंचावर नवी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण संवर्धन, सांडपाणी पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकासासाठीच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘हरित यशोगाथा सन्मान २०२५’ हा पुरस्कार ‘सर्वांगीण उत्कृष्टता’ या श्रेणीमध्ये प्रदान करण्यात आला. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिकेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘थिमॅटिक क्षेत्रातील सर्वांगीण उत्कृष्टता पुरस्कार’ स्विकारला.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था, मुंबई यांच्या वतीने हा पुरस्कार सन्मानचिन्ह व गौरवपत्र स्वरुपात प्रदान करण्यात आला असून याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे व उपअभियंता स्वप्निल देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेला पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल लाभलेला हा मानाचा पुरस्कार नवी मुंबई महापालिकेच्या सर्वांगीण पर्यावरणीय कार्याची आणि शाश्वत व हरित शहर घडविण्याच्या वचनबद्धतेची दखल घेणारा असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यामध्ये विविध उपक्रमात पर्यावरणशील दृष्टीकोन जपत नवी मुंबईकर नागरिकांनी दिलेल्या सक्रीय योगदानाचा महत्वाचा वाटा असल्याचे सांगून सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.     

पर्यावरण तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांशी संबंधित उत्पादकांना एकत्र आणणे, अत्याधुनिक स्वरुपाचे नवीन तंत्रज्ञान सादर करणे आणि परस्पर सहकार्याच्या संधी निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. IFAT इंडिया २०२५ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात जगभरातील ५० पेक्षा अधिक देशांतील उत्पादक तसेच विविध देशांमधील सरकारी अधिकारी यांनी सहभाग नोंदविला. जल व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरणीय शाश्वततेवरील अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपाययोजना या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

या नामांकित प्रदर्शनाचे उद् घाटन करण्याचा बहुमान नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना लाभला असून यावेळी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक डॉ. जयराज पाठक, युनिसेफचे प्रतिनिधी संजय सिंह, महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचे मिशन संचालक सुधाकर बोबडे, राज्य हवामान कृती संचालनालयाचे संचालक अभिजित घोरपडे, मिरा भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा उपस्थित होते.

या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन प्रणाली आणि पाणीपुरवठा व्यवस्थापन या विषयीच्या उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करणारा स्टॉल लावण्यात आला असून याठिकाणी जगभरातील प्रदर्शक भेट देऊन माहिती घेत आहेत व प्रशंसा करीत आहेत.

१६ ऑक्टोबर पर्यंत सुरु असणाऱ्या IFAT इंडिया २०२५ प्रदर्शनाला भेट देताना त्याठिकाणी असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या माहितीपूर्ण स्टॉललाही भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

भाजपच्या नवी मुंबई जिल्हा सचिवपदी पांडुरंग आमले

Next Post

भाजपकडून घरोघरी सुंगधी उटण्याचे वितरण

Next Post
भाजपकडून घरोघरी सुंगधी उटण्याचे वितरण

भाजपकडून घरोघरी सुंगधी उटण्याचे वितरण

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यामुळे तासिका शिक्षकांची दिवाळी होणार आनंददायी

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यामुळे तासिका शिक्षकांची दिवाळी होणार आनंददायी

सानपाडा विभागातील कचऱ्याचे ढिगारे हटविण्याची भाजपची मागणी

सानपाडा विभागातील कचऱ्याचे ढिगारे हटविण्याची भाजपची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com