नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात व सभोवतालच्या विभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर लावण्यात आले आहे. यामुळे परिसराला बकालपणा आला असून पालिकेचे उत्पन्नही बुडालेले आहे. हे अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत व हे बॅनर तातडीने हटवावेत अशी मागणी शिवसेनेचे महादेव पवार यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.
परिसराला बकालपणा आणणाऱ्या व महापालिकेचे उत्पन्न बुडवणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे. निवेदनासोबत महादेव पवार यांनी बॅनरचे फोटोही जोडले आहेत. महापालिकेने अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल न केल्यास महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा महादेव पवार यांनी दिला आहे.



