नवी मुंबई : प्रभाग क्रमांक २३ मध्ये शिवसेनेच्या नगरसेविका सुनिता मांडवे यांचा निवडणूकीत पराभव झाला. पराभवातील अंतराबाबत प्रभागातील रहिवाशांकडूनच संशय व्यक्त केला जात असून सुनिता मांडवे यांचा जनतेने नाही तर मशिनने पराभव केला असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त होत असून ईव्हीएमवरच केला जात आहे. रहिवाशांनी मांडवे परिवाराच्या घरी भेट देत आजही आम्ही तुमच्यासोबतच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तीन दिवस नागरिकांनी मांडवेंच्या घरी भेटी दिल्यावर मांडवे परिवारांने रहिवाशांच्या प्रेमाबाबत, विश्वासाबाबत आभार मानले आहेत.
मांडवे परिवाराने आभार मानताना माजी नगरसेविका सौ. सुनिता मांडवे यांनी सांगितले की, नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा, सोळा, सोळा एमधील रहिवाशांशी तसेच कुकशेत गाव व सारसोळे गावातील रहिवाशांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यापूर्वी सर्वप्रथम आम्ही आपले मनापासून आभार मानतो. आपण आमच्या कार्यावर विश्वास ठेवून जे मतदान केले, त्या विश्वासाची, प्रेमाची आम्ही कदापिही उतराई करु शकत नाही. आपण आमच्या परिवारातीलच एक सदस्य आहात व यापुढेही राहणार, याची आम्हाला खात्री आहे, असे सुनिता मांडवे यांनी म्हटले आहे.
निवडणूका म्हटल्यावर हार-जीत चालतेच. कोणीतरी विजयी होणार आणि कोणीतरी पराभूत होणार हे ओघाने आलेच. पण निवडणूकीपूर्वी आम्ही मंजुर केलेल्या कामाची व मंजुरीच्या अंतिम अवस्थेत असलेल्या कामांची आपणास माहिती देण्यासाठी हा सुसंवाद साधत आहोत. मांडवे परिवार लोकहितैषी कामे करण्यात सदैव पुढाकार घेत आलेला आहे व यापुढेही घेत राहणार. पद गेले म्हणून कामे होणार नाही अथवा सुसंवाद होणार नाही, अशातला प्रकार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवी मुंबई शहराच्या विकास आराखड्यामध्ये पार्किग, महिला सक्षमीकरण केंद्र, समाजमंदिर, भाजी मार्केट, मच्छि व मटण मार्केट या सर्व नागरी सुविधांसाठी नेरूळ सेक्टर आठ ए येथील सिडकोच्या मोकळे भुखंड आरक्षित करण्यात आलेले आहेत व लवकरच या कामांना मंजुरी मिळणार आहे. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. यासाठी महापालिकेत २०१० ते २०२५ कालावधीत महापालिका प्रशासनाकडे आम्ही लेखी पाठपुरावा केलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत जनतेला या सुविधांची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. महापालिकेत तसा ठरावही मंजुर करुन घेण्यात आलेला असल्याची माहिती माजी नगरसेविका सौ, सुनिता मांडवे यांनी रहिवाशांना दिली आहे.
नेरूळ आठमधील कामांबाबत माहिती देताना सुनिता मांडवे यांनी सांगितले की, १) नेरूळ सेक्टर आठमधील संजीवनी, उन्नती, त्रिमूर्ती, शिवनेरी, ग्रिनफिल्ड, तृप्ती, अरुणोदय, सह्याद्री, प्रभात, सप्तर्षी, शिवतीर्थ, श्रमसाफल्य, पंचवटी या सोसायटींमध्ये कंडोमिनियमअंर्तगत मल:निस्सारण वाहिनी तसेच जलवाहिनी बदलण्याचे काम निविदा प्रक्रियेत असून लवकरच या कामांची निविदा जाहीर होणार आहेत. २) नेरूळ सेक्टर दहामधील वृंदावन, इंद्रप्रस्थ, साईकृपा, नंदनवन, सनशाईन या सोसायटींमध्ये कंडोमिनियमअंर्तगत मल:निस्सारण वाहिनी तसेच जलवाहिनी बदलण्याचे काम निविदा प्रक्रियेत असून लवकरच या कामांची निविदा जाहीर होणार आहेत. ३) कै. आमदार अण्णासाहेब पाटील घरमालक संघटना यामध्ये कंडोमिनियिम अंर्तगत मल:निस्सारण वाहिनी बदलण्याच्या कामाचे कार्यादेश आचारसंहिता संपल्यावर देण्यात येणार आहेत. ४) कै. आमदार अण्णासाहेब पाटील घरमालक संघटना यामध्ये कंडोमिनियिम अंर्तगत जलवाहिनी बदलण्याच्या कामाचे कार्यादेश आचारसंहिता संपल्यावर देण्यात येणार आहेत. ५) राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात नवीन ओपन जीमचे कार्यादेश आचारसंहिता संपल्यावर देण्यात येणार आहेत. ६) कै. ज्ञानेश्वर शेलार ग्रंथालयामध्ये नवीन शौचालयाचे कार्यादेश आचारसंहिता संपल्यावर देण्यात येणार आहेत. ७) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाशेजारी नवीन शौचालयाचे कार्यादेश आचारसंहिता संपल्यावर देण्यात येणार आहेत. ८) राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात नवीन शौचालयाचे कार्यादेश आचारसंहिता संपल्यावर देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
महापालिका प्रशासनाकडे सातत्याने नागरी कामांसाठी, सुविधांसाठी व समस्या निवारणासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. पद असो वा नसो. तुमच्यासाठी आम्ही काम करतच राहणार आहोत. यापुढेही आपल्या कामांसाठी पाठपुरावा करतच राहणार, याबाबत खात्री बाळगा. तुमच्या व आमच्यात कधीही दुरावा निर्माण होणार नाही. आपल्यातील विश्वासाचे व प्रेमाचे, जिव्हाळ्याचे एक अतुट नाते निर्माण झालेले आहे व हे नाते कायम राहणार असल्याचे माजी नगरसेविका सौ. सुनिता मांडवे यांनी यावेळी सांगितले.



