• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 24, 2026

‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ असे म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा

adminbyadmin
in देश - विदेश
0
‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ असे म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( एआयएमआयएम) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी “कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” असे वक्तव्य केले होते. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान, सहर शेखने माफीनामा लिहून दिला असून त्याबाबत पोलिसांनी तक्रारदारांना लेखी कळविले आहे. माफिनामा स्वीकारल्यानंतर हे प्रकरण दप्तरी नोंदवण्यात आले आहे.

मुंब्रा शहरातून एआयएमआयएम पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सहार युनूस शेख या चांगल्याच चर्चेत आल्या. सहर शेख यांच्यासह एआयएमआयएमचे पाच नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा धक्का मनाला जातो. या विजयानंतर भाषण करताना शेख यांनी “कैसा हराया, अभी हमलोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” असे वक्तव्य करत आव्हाडांना डिवचले होते. त्यांच्या या भाषणावर सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. यानंतर पोलिसांनी सहार शेख यांना नोटीस बजावली. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन चौकशीबाबत विचारणा केली. त्यावेळी शिंदे यांनी सहर शेखच्या चौकशीचा अहवाल सादर केला.

“अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” या वक्तव्याबद्दल तिने २३ जानेवारी २०२६ रोजी माफीनामा दिला आहे, असे शिंदे यांनी लिखित स्वरूपात दिले.

मुंब्रा येथे झालेल्या सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाच्या झेंडा आणि निशाणीच्या संदर्भात होते. कोणाचेही मन दुखावण्याचा किंवा सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हेतू नव्हता, “तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरणार” आहोत. वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची जाहीर आणि लेखी स्वरूपात माफी मागते, असे तिने म्हटले आहे. माफिनामा स्वीकारल्यानंतर हे प्रकरण दप्तरी नोंदवण्यात आले आहे. भविष्यात अशा प्रकारचे वक्तव्य झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तजवीज पोलिसांनी ठेवली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सोमय्या यांना लिखित स्वरूपात दिली आहे.

Previous Post

रविवारी नेरूळमध्ये शिवसेनेचे रक्तदान शिबीर

Next Post

महाराष्ट्रात सर्वदूर तिरंगा पोहचवण्याचा संकल्प करा: हर्षवर्धन सपकाळ

Next Post
महाराष्ट्रात सर्वदूर तिरंगा पोहचवण्याचा संकल्प करा: हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्रात सर्वदूर तिरंगा पोहचवण्याचा संकल्प करा: हर्षवर्धन सपकाळ

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सेवांमध्ये अधिक पारदर्शकता येईल : आकाश फुंडकर

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सेवांमध्ये अधिक पारदर्शकता येईल : आकाश फुंडकर

कोकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन विभागीय आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण 

कोकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन विभागीय आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण 

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com