स्वयंम न्यूज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने नेरुळ सेक्टर आठमध्ये शिवसेनेच्यावतीने रविवार, दि. २५ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेनेचे माजी महापालिका पक्षप्रतोद रतन मांडवे, माजी नगरसेविका सुनिता मांडवे, बेलापुर विधानसभेचे युवा अधिकारी निखिल मांडवे आणि प्रभाग २३ मधील शिवसेना पदाधिकारी, युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेना व शिवसैनिकांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नेरुळ सेक्टर आठमधील एल मार्केट परिसरात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे रक्तदान शिबीर होणार आहे. समाजात सध्या असलेला रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन युवा सेनेचे पदाधिकारी निखिल मांडवे यांनी केले आहे.



