• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2026

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सेवांमध्ये अधिक पारदर्शकता येईल : आकाश फुंडकर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सेवांमध्ये अधिक पारदर्शकता येईल : आकाश फुंडकर

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

अकोला : वॉररूम, डॅशबोर्ड, व्हाटसॲप चॅटबोट अशा अद्ययावत तंत्रज्ञानाधारित सेवांमुळे नागरिकांना वेळीच अचूक माहिती व सेवा मिळून पारदर्शकता येण्यास मदत होईल, असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी येथे व्यक्त केला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात पालकमंत्री कार्यालय व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सुशोभीकरण कामे, वॉररूम, डॅशबोर्ड व व्हाटसॲप चॅटबोट प्रणाली, बहुउद्देशीय सभागृह, सौर ऊर्जा पॅनल, मिशन एक्सलन्स टार्गेटपीक शैक्षणिक ॲप आदी विविध सेवा-सुविधांचा शुभारंभ झाला. आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांचे नवे सुसज्ज कार्यालय व सभागृह जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. जिल्हाधिका-यांच्या संकल्पनेतून डॅशबोर्ड, चॅटबोट, वॉररूम या सेवांचे लोकार्पण झाले. वॉररूमद्वारे आपत्ती व्यवस्थापनादरम्यान यंत्रणा सज्ज करणे, नागरिकांना माहिती देणे व तातडीच्या प्रसंगी आवश्यक कार्यवाही, ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत सर्व यंत्रणांना तत्काळ संपर्क साधता येणार आहे.

जिल्हा डॅशबोर्ड

जिल्हा डॅशबोर्डद्वारे शासकीय योजनांची योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, सद्य:स्थिती नागरिकांना जाणून घेता येणार आहे. सुशासन व जनतेप्रती उत्तरदायित्वाची संकल्पना त्यातून साकारणार आहे.

व्हाटसॲप चॅटबोट

अकोला जिल्हा व्हाटसॲप चॅटबोट उपक्रमाचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. ८७९९९५२१५८ या व्हाटसॲप क्रमांकावर ही सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांना सर्व योजना, सेवांची माहिती थेट मोबाईलद्वारे मिळणार आहे. मिशन एक्सलन्स या टार्गेट पीक ॲपचाही शुभारंभ झाला. त्याद्वारे जि. प. शाळा, मनपा आदी शाळांतील विद्यार्थ्यांकडून महत्वाच्या विषयांचे अध्ययन करून घेतले जाते.  त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर १५० कि. वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. या प्रकल्पामुळे वीजेवरील खर्चात मोठी बचत होणार आहे.

शासनातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांना ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सर्वोत्तम पोलीस अधिक्षक पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा सूचना अधिकारी अनिलकुमार चिंचोले, ऋषिकेश आग्रे यांनाही उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले.

Previous Post

महाराष्ट्रात सर्वदूर तिरंगा पोहचवण्याचा संकल्प करा: हर्षवर्धन सपकाळ

Next Post

कोकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन विभागीय आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण 

Next Post
कोकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन विभागीय आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण 

कोकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन विभागीय आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण 

जनतेसाठी समाज मंदिर उपलब्ध करा अन्यथा दालनात उपोषण

जनतेसाठी समाज मंदिर उपलब्ध करा अन्यथा दालनात उपोषण

अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

क्रिडांगणावर सुविधा उपलब्ध करुन देण्याची एमआयएमची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com