• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 29, 2026

जनतेसाठी समाज मंदिर उपलब्ध करा अन्यथा दालनात उपोषण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जनतेसाठी समाज मंदिर उपलब्ध करा अन्यथा दालनात उपोषण

शिवसेनेच्या महादेव पवार यांचा महापालिका आयुक्तांना इशारा

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील लोकमान्य टिळक समाजमंदिर १५ फेब्रुवारीपर्यत रहीवाशांसाठी खुले करा अन्यथा १६ फेब्रुवारीपासून महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयात विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शिवसेनेचे महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांना लेखी निवेदनातून दिला आहे.

नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिका प्रशासनाने लोकमान्य टिळक समाजमंदिराची उभारणी केलेली आहे. नेरूळ सेक्टर सहामधील रहिवाशांसाठी व सारसोळे गावातील ग्रामस्थांसाठी एकमेव समाजमंदिर आहे. या समाजमंदिरात विवाह, वाढदिवस, साखरपुडा, सोसायटीच्या बैठका व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने आरोग्य उपकेंद्र सुरु करण्याच्या नावाखाली या समाजमंदिराचा ताबा घेतल्यापासून स्थानिक रहिवाशांची व सारसोळेच्या ग्रामस्थांची कार्यक्रमासाठी मोठी गैरसोय होत आहे. मुळातच कुकशेत गावातील नागरी आरोग्य केंद्र हाकेच्या अंतरावर असताना व स्थानिक रहिवाशी या आरोग्य केंद्रात पायी चालत जात असताना या आरोग्य उपकेंद्राची कोणाला गरजही नव्हती व स्थानिक जनतेने मागणीही केली नव्हती. समाजमंदिर बंद झाल्यावर कार्यक्रमाची गैरसोय होणार असल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक जनतेमध्ये संताप निर्माण झाला. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी समाजमंदिराच्या आवारात निदर्शनेही केली होती. आरोग्य विभागाने समाजमंदिरातील उपकेंद्र बंद केले असले तरी स्थानिक जनतेसाठी हे समाजमंदिर आजही कार्यक्रमासाठी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत आहे. स्थानिक रहिवाशांना कार्यक्रमासाठी सेक्टर दोनमधील अभिनंदन हॉल, सेक्टर १२ मधील देवाडिगा, ज्येष्ठ नागरिक भवन, झुलेलाल मंदिर, सेक्टर १४ मधील वेलकम हॉल या ठिकाणी अव्वाच्या सव्वा भाडे मोजून हॉलमध्ये कार्यक्रम करावे लागत आहे. स्वत:च्या परिसरात समाजमंदिर असतानाही त्यांना इतरत्र जावे लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता व स्थानिक नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहता स्थानिक जनतेसाठी हे समाजंदिर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत. १५ फेब्रुवारीपर्यत समाजमंदिर स्थानिकांसाठी खुले न झाल्यास १६ फेब्रुवारीपासून नेरूळ विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शिवसेनेचे महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

Previous Post

कोकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन विभागीय आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण 

Next Post

क्रिडांगणावर सुविधा उपलब्ध करुन देण्याची एमआयएमची मागणी

Next Post
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

क्रिडांगणावर सुविधा उपलब्ध करुन देण्याची एमआयएमची मागणी

हाजी शाहनवाज खान कोकण रत्न दिव्यांग पुरस्काराने सन्मानित

हाजी शाहनवाज खान कोकण रत्न दिव्यांग पुरस्काराने सन्मानित

सुशिक्षितांच्या नवी मुंबईचा उच्च शिक्षित महापौर

सुशिक्षितांच्या नवी मुंबईचा उच्च शिक्षित महापौर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com