नवी मुंबई : शैक्षणिक. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत राहून जनसेवा करणारे एमआयएमचे युवा नेते व नवी मुंबई, कोकणचे प्रभारी हाजी शाहनवाज खान यांना कोकण रत्न दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- मुंबईतील नागपाडा येथे कोकण कम्युनिटी फोरमच्यावतीने जागतिक कोकणी दिनानिमित्त आयोजित करंण्यात आलेल्या कोकण मेलामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. भायखळाचे आमदार मनोज जामसुतकर, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि अंजुमन इस्लामचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले
अंजुमन इस्लामचे अध्यक्ष जाहिर काझी, कोकण बॅंकचे अली समशी आदी उपस्थित होते.. यावेळी हाजी शाहनवाज खान यांना प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. गेली अडीच दशके हाजी शाहनवाज खान विविध व्यासपिठावरुन जनसामान्यांची सेवा करत असून मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व अन्य कार्यक्षेत्रात करत असलेल्या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. सामाजिक प्रश्नांवर जनआंदोलन, निदर्शने, मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा यामुळे हाजी शाहनवाज खान गेली काही वर्षे चर्चेत आहेत. या पुसऱ्काराने माझ्या कार्याची नव्हे तर कोकणच्या सुपुत्राची दखल घेतली असून हा कोकणच्या मातीचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया हाजी शाहनवाज खान यांनी यावेळी व्यक्त केली आहे.



