• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, March 1, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 1, 2026

आधी जंगलातील बिबटे सांभाळा, मग शिवसेनेच्या वाघांच्या नादी लागा : डॉ. श्रीकांत शिंदे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
इंडोनेशिया येथे जाणाऱ्या भारताच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार नेतृत्व

नवी मुंबई : काही दिवसांपूर्वी बिबट्यांना जंगलातच रोखण्यासाठी जंगलात शेळ्या बकऱ्या सोडण्यात येतील, असे काही जणांकडून सांगण्यात आले होते. मात्र आता तेच म्हणत आहे की जंगलात फळझाड लावू आणि बिबट्यांना रोखू. पहिले हे नक्की करा की बिबटे हे शाकाहारी आहेत की मांसाहारी. त्यामुळे आधी जंगलातील बिबटे सांभाळा. मग शिवसेनेच्या वाघांच्या नादी लागा, असा इशारा शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपचे नेते व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना दिला आहे.

नवी मुंबईतील ऐरोली येथे शिवसेनेच्या नगरसेवकांचा अभिनंदन मेळावा पार पडला. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे बोलत होते.

राज्याच्या वनविभागात काय काय प्रकार चालू आहेत बऱ्याच गोष्टी कानावर आल्या आहेत. आम्ही त्याबाबत जास्त काही बोलत नाही. वनविभागाकडे पैशांची कमतरता असल्याने जंगलातील सागाची झाडं तोडून त्यांची विक्री करणार आणि त्यातून पैसे कमावणार आहेत. याबाबत माहिती घेणे देखील गरजेचे आहे, असा गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

परिवहन समितीच्या निवडणुकीत झालेल्या प्रकाराबाबत शिंदे भाष्य करताना म्हणाले की महापालिकेत लोकशाही चालेल हुकूमशाही चालणार नाही. तर एकनाथ शिंदे हे एक शाखाप्रमुख ते थेट मुख्यमंत्री झाले. आज पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांना एकनाथ शिंदेंबाबत असूया आहे, अशी टीका ही त्यांनी केली. तर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नवी मुंबईसाठी घेतलेल्या विविध निर्णयांचा यावेळी त्यांनी पाढा वाचून दाखवला.

बिबट्या शहरात येऊ नये म्हणून जंगलात शेळ्या सोडणार होतात. आता म्हणतात की आम्ही फळझाडे लावू. बिबट्या हे शाकाहारी आहेत की मांसाहारी हे पहिले माहिती करून घ्यावे, मग वनखात्याचा कारभार करावा, असा टोला देखील खासदार शिंदे यांनी नाईक यांना लगावला.

वनखात्यांच्या कारभाराबाबत अनेक गोष्टी कानावर पडत आहेत. वन खात्याकडे पैशाची कमतरता असल्याने जंगलातील सागाची झाड तोडून त्यातून पैसे कमावणार आहेत, असे वक्तव्य करत खासदार शिंदे यांनी राज्याच्या वनखात्यावरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनारथ शिंदे यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. यातच गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांना देखील माजी करून टाकू, त्यांचे राजकीय अस्तित्व मिटवून टाकू, असा इशारा दिला होता. यानंतर खासदार शिंदे यांनी या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर देत जर एवढीच खुमखुमी असेल तर येत्या निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहा मग सगळी खुमखुमी उतरवतो, असा थेट इशारा नाईक यांना दिला होता. यानंतर नाईक यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. मात्र आता शिवसेनेकडून गणेश नाईक यांना चांगलेच लक्ष्य करण्यात येत आहे. या वादात आता खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी देखील उडी घेतली असून गणेश नाईक यांच्या वनखात्याला त्यांनी लक्ष्य केले आहे.

आज अनेक जण नवी मुंबई महापालिका जिंकली म्हणून फुशारक्या मारत आहेत. मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की अगदी निसटता विजय त्यांनी मिळवला आहे. आमच्या काही चुका झाल्या म्हणून आमचे काही नगरसेवक पडले. असे ही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी हम हम है, बाकी सब पानी कम है. त्यामुळे येत्या लोकसभेत तुम्हाला दाखवून देऊ शिवसेनेची ताकद काय आहे. असा इशारा ही शिंदे यांनी यावेळी दिला.

Previous Post

सागरी वाहतुकीत महाराष्ट्राची झेप; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com