गतविजेत्या आरसीबीसोबत सलामीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा सामना
संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा पहिला सामना २८ मार्च रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सलामीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा सामना करेल. आसाम, बंगाल व तामिळनाडू येथे निवडणुका असल्याने तुर्तास तरी बीसीसीआयने पहिल्या १६ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या १६ दिवसांत २० सामने खेळवण्यात येतील. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर पुढील वेळापत्रकाची घोषणा केली जाईल.
भारतीय संघाने तीन दिवसांपूर्वी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला अन् त्यानंतर सर्वांना आयपीएल २०२६ ची प्रतीक्षा होती. अखेर ती आज संपली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर २९ मार्च रोजी खेळले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स यांच्यात गुवाहाटी येथे सामना होईल. गत उपविजेते पंजाब किंग्स ३१ मार्च रोजी मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्सला भिडेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ च्या हंगामात इतिहास रचला, १७ वर्षांनंतर त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद जिंकले. विराट कोहलीने मागील आवृत्तीत ६५० पेक्षा जास्त धावा केल्या. जेतेपदाचा बचाव करण्यासाठी त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबादचे पहिल्या लढतीत आव्हान असेल, त्यानंतर ते ५ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध बंगळुरू येथे खेळतील. त्यानंतर राजस्थान रॉयल्स ( १० एप्रिल) आणि मुंबई इंडियन्स ( १२ एप्रिल) यांच्याविरुद्ध त्यांची लढत होईल.
सनरायझर्स हैदराबादकडून मागील पर्वात खूपच अपेक्षा होत्या, परंतु त्यांना अपयश आले. त्यांना या पर्वात गतविजेत्या आरसीबीसह कोलकाता नाइट रायडर्स ( २ एप्रिल, कोलकाता), लखनौ सुपर जायंट्स ( ५ एप्रिल, हैदराबाद) आणि पंजाब किंग्स ( ११ एप्रिल, मुल्लानपूर) यांच्याविरुद्ध खेळावे लागेल. चेन्नई सुपर किंग्स ३० मार्च ला आपल्या मोहिमेला सुरुवात करताना राजस्थान रॉयल्सला भिडेल. या सामन्याच्या निमित्ताने संजू सॅमसन प्रथमच आपल्या माजी संघाविरुद्ध खेळताना दिसेल. संजू या पर्वात चेन्नईकडून खेळणार आहे. त्यानंतर सीएसकेचा सामना पंजाब किंग्स ( ३ एप्रिल, चेन्नई), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( ५ एप्रिल, बंगळुरू) आणि दिल्ली कॅपिटल्स ( ११ एप्रिल, चेन्नई) यांच्याशी होईल.
आयपीएल २०२६चे वेळापत्रक
२८ मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद, बंगळुरू
२९ मार्च – मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई
३० मार्च – राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, गुवाहाटी
३१ मार्च – पंजाब किंग्स वि. गुजरात टायटन्स, मुल्लानपूर
१ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स, लखनौ
२ एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
३ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, चेन्नई
४ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
४ एप्रिल – गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स, अहमदाबाद
५ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्स, हैदराबाद
५ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
६ एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स, कोलकाता
७ एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, गुवाहाटी
८ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स, दिल्ली
९ एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स वि. लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता
१० एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुवाहाटी
११ एप्रिल – पंजाब किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुल्लानपूर
११ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
१२ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई
१२ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ

