• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 13, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 13, 2026

महापौर सुजाताताई पाटील यांच्या उपस्थितीत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा आरंभ

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
महापौर सुजाताताई पाटील यांच्या उपस्थितीत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा आरंभ

May be an image of one or more people, hospital and text

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, राष्ट्रीय पातळीवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला असून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही महापौर सुजाताताई पाटील यांच्या हस्ते गुरुवारी सीबीडी बेलापूर येथील नागरी आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य समितीचे सभापती डॉ.जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम.स्वाती गुरखे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, वैदयकीय अधिकारी डॉ. अर्चना तायडे उपस्थित होते.

यावेळी महापौर महोदयांच्या उपस्थितीत कु. अनुष्का सोमनाथ कोळी व कु.अक्षता सचिन कातकरी या विदयाप्रसारक हायस्कुल बेलापूर येथे इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या तसेच कु.अनुजा शंभु माळेकर या नमुंमपा शाळा क्र.४ सीबीडी बेलापूर येथे इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या विदयार्थीनींना एचपीव्ही लस देण्यात आली. यावेळी त्यांना प्रोत्साहनपर कंपासपेटी भेट म्हणून देण्यात आली.

याप्रसंगी बोलताना महापौर सुजाताताई पाटील यांनी सध्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता व त्यातही स्त्रियांना होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाची मोठी संख्या विचारात घेता सदर लस प्रतिबंधात्मक म्हणून घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. त्यादृष्टीने पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरातील मुलींचे यापासून संरक्षण व्हावे याकरिता ही लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून त्याचा लाभ प्रत्येक मुलीला मिळावा याकरिता पालकांनी जागरुक रहावे व आपल्या मुलीचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापौर सुजाताताई पाटील यांनी केले. सदर लसीकरण मोहीमेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शाळांच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात यावेत तसेच महानगरपालिकेची रुग्णालये व आरोग्य केंद्रे व वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे येथेही बॅनर्स लावून व्यापक प्रचार करावा असे महापौरांनी सूचित केले.

या मोहिमेत १४ वर्षे वयोगटातील (ज्या मुलींनी १४ वर्षे पूर्ण केलेली आहेत व १५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत) मुलींना एचपीव्ही लसीकरण करण्यात येईल. मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील ९० दिवसांच्या कालावधीत १५ वर्षे पूर्ण होणाऱ्या मुली देखील या तीन महिन्यांच्या एचपीव्ही (एचपीव्ही) लसीकरण मोहीमेत लसीकरणास पात्र असतील. नवी मुंबई महानगरपालिकेने आपली ५ रुग्णालये व २६ नागरी आरोग्य केंद्रे या ठिकाणी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एचपीव्ही लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे.

यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील १४ वर्षे पूर्ण केलेली आहेत व १५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत अशा मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. नमुंमपाची सर्व रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यासहित IMA, IAP, NIMA, HIMPAM, खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. यांच्यामार्फत एचपीव्ही लसीकरणाबाबतची जनजागृती करण्यात येत आहे.

तरी नवी मुंबईतील पालकांनी गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी या मोहीमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वर्षे पूर्ण न केलेल्या वयोगटातील प्रत्येक मुलीला एचपीव्ही लस देऊन गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

थकीत मालमत्ता करावर ९० टक्के सवलत देण्याची युवा सेनेची मागणी

Next Post

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार : मंत्री नितेश राणे

Next Post
‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार : मंत्री नितेश राणे

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार : मंत्री नितेश राणे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com