स्वयं न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे व राजेश पवार आणि तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

