• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 19, 2026

प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन प्रकल्पामध्ये मोफत घरे देण्याची शिवसेनेची मागणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन प्रकल्पामध्ये मोफत घरे देण्याची शिवसेनेची मागणी

नवी मुंबई : एमआयडीसीच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या पुनर्वसन प्रकल्पांमध्ये मोफत घरे देण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई परिसरातील एमआयडीसी अंतर्गत १९६३ साली औ‌द्योगिकीकरणाच्या उ‌द्देशाने स्थानिक शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनी अत्यल्प (कवडीमोल) दराने संपादित करण्यात आल्या. त्या वेळी संबंधित प्रकल्पग्रस्तांना रोजगार व इतर सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. काही काळासाठी काही प्रकल्पांमध्ये रोजगार मिळाला असला, तरी नंतर अनेक उ‌द्योग बंद पडल्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांचे रोजगारही हिरावले गेले आहेत. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सिडकोमार्फत संपादित जमिर्नीच्या बदल्यात साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड दाटप करण्यात आले आहे. मात्र, एमआयडीसीकडून बहुतांश प्रकल्पग्रस्त कुटुंबांना केवळ १०० चौरस मीटरपर्यंत मर्यादित भूखंड देण्यात आला आहे आणि अनेकांना तोही लाभ मिळालेला नाही. एमआयडीसी क्षेत्रातील काही मोकळ्या जागांवर वर्षानुवर्षे स्थानिक नागरिकांनी झोपडपट्ट्या उभारून वास्तव्यास सुरुवात केली आहे. आता त्या ठिकाणी या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत इमारती उभारून झोपडप‌ट्टीधारकांना घरे देण्यात येत आहेत. मात्र, ज्या मूळ प्रकल्पग्रस्तांनी आपली जमीन राज्याच्या औ‌द्योगिक विकासासाठी दिली, त्यांच्यासाठी कोणतीही ठोस पुनर्वसन योजना किंवा गृहनिर्माण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, ही बाब अन्यायकारक आहे. जमीन देणाऱ्या सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा विशेष विचार करून त्यांनाही सदर पुनर्वसन प्रकल्पामध्ये किमान ५०० चौरस फूट क्षेत्रफळाची मोफत घरे देण्याची मागणी नामदेव भगत यांनी केली आहे.

Previous Post

एल मार्केट परिसरातील दिव्यांग व्यक्तिंचे स्टॉल हटवून तिथे स्वच्छता करण्याची युवा सेनेची मागणी

Next Post

वस्त्र पुनर्प्रक्रिया बहुउपयोगी अशा पर्यावरणशील प्रकल्पाची महापौर सुजाता पाटील यांनी केली प्रशंसा

Next Post
वस्त्र पुनर्प्रक्रिया बहुउपयोगी अशा पर्यावरणशील प्रकल्पाची महापौर सुजाता पाटील यांनी केली प्रशंसा

वस्त्र पुनर्प्रक्रिया बहुउपयोगी अशा पर्यावरणशील प्रकल्पाची महापौर सुजाता पाटील यांनी केली प्रशंसा

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

पावसाळा कालावधीमध्ये एअर जेट मशिन/ वॉटर जेटच्या माध्यमातून पदपथांची सफाई करण्याची युवा सेनेची मागणी

महापालिका सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

महापालिका सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com