सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पावसाळा कालावधीमध्ये नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारणीसोबत महिन्यातून एकदा एअर जेट मशिन/ वॉटर जेटच्या माध्यमातून पदपथांची सफाई करण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
पावसाळा आता अवघ्या दीड महिन्यावर आलेला आहे. पावसाळा कालावधीत पाऊस पडल्यावर पदपथांवर शेवाळ साचते. पदपथावर निसरडे झाल्यावर स्थानिक रहिवाशी तेथून ये-जा करताना घसरुन पडतात, त्यांना दुखापती होतात. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासन पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी केली जाते. परंतु त्याजोडीला पालिका प्रशासनाने पावसाळा कालावधीमध्ये नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारणीसोबत महिन्यातून एकदा एअर जेट मशिन/ वॉटर जेटच्या माध्यमातून पदपथांची सफाई करावी, जेणेकरुन पदपथावर शेवाळ साचणार नाही. त्यामुळे पावसाळा कालावधीत पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारणीसोबत महिन्यातून एकदा एअर जेट मशिन/ वॉटर जेटच्या माध्यमातून पदपथांची सफाई करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी युवा सेनेचे निखिल रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
