• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, April 21, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 21, 2026

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील पाणपोई सुरु करण्याची शिवसेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील पाणपोई सुरु करण्याची शिवसेनेची मागणी

नवी मुंबई : कडक उन्हाळ्याने रहिवाशी त्रस्त झाले असल्याने उद्यानात बसविण्यात आलेल्या पाणपोईचे लोर्कापण तातडीने होण्याची गरज आहे. नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानात फिरण्यासाठी तसेच व्यायामासाठी येणाऱ्या स्थानिक रहिवाशांकडून होत असलेल्या मागणीची दखल घेत स्थानिक विभागातील शिवसैनिक महादेव पवार यांनी उद्यानात बसविण्यात आलेल्या पाणपोईचे लवकरात लवकर लोकार्पण करण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.

सेक्टर ६ येथील राजामाता जिजाऊ गार्डन परिसरात सुमारे दोन महिन्यांपूर्वी पाणपोई उभारण्यात आली असली तरी ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. एप्रिल-मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे परिसरातील नागरिक, विशेषतः महिला व लहान मुले, पिण्याच्या पाण्याअभावी त्रस्त झाले आहेत.

पाणपोई बंद असल्यामुळे नागरिकांना घरून पाणी आणावे लागत असून, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात श्रीमती आशा कांबळे तसेच गार्डनमध्ये येणाऱ्या महिला वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक शिवसैनिक महादेव पवार यांनी या प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, पाणपोई तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. “उन्हाळ्यात पाण्याची सर्वाधिक गरज असताना पाणपोई बंद ठेवणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक आहे. पावसाळ्यात ती सुरू करून काहीही उपयोग होणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने तात्काळ दखल घेऊन पाणपोई सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. उन्हाळ्यात लोकांना गरज असताना पाणपोईचे उद्घाटन न करणे संतापजनक बाब असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिक महादेव पवार यांनी केली आहे.

Previous Post

महापालिका सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

बुधवारी, दि. २२ एप्रिल रोजी नवी मुंबईकरांचा पाणीपुरवठा बंद

Next Post
बुधवारी, दि. २२ एप्रिल रोजी नवी मुंबईकरांचा पाणीपुरवठा बंद

बुधवारी, दि. २२ एप्रिल रोजी नवी मुंबईकरांचा पाणीपुरवठा बंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com