सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेमार्फत बुधवार २२ एप्रिल २०२६ रोजी सी. बी. डी. सेक्टर-२८ पंप हाऊस येथे मॅनिफोल्ड व व्हॉल बसविणे तसेच कळंबोली सर्कल, नेरुळ सेक्टर-१९ वंडरपार्क येथील जलवाहिनीवर व्हॉल बसविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहे. तसेच घणसोली सेक्टर २ येथील ९०० मी.मी. व्यासाची पाईपलाईन जोडण्याच्या कामासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा हा बुधवार दि. २२ एप्रिल २०२६ रोजी बंद राहणार आहे. त्यासाठी बुधवार दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत १२ तासांकरीता मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
सदर कालावधीमध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे बुधवार दि. २२ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व गुरुवार दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
