• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, April 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 28, 2026

उरण तालुका रिक्षा युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल पुरो यांचे देहावसान

adminbyadmin
in रायगड
0
उरण तालुका रिक्षा युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल पुरो यांचे देहावसान
विठ्ठल ममताबादे : Navimumbailive.com@gmail.com
उरण : उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक, विद्यमान अध्यक्ष तथा नागाव-म्हातवलीतील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते प्रफुल्ल किशोर पुरो यांचे सोमवारी दीर्घ आजाराने देहावसान झाले. मृत्यू समयी ते ७५ वर्षांचे होते. वरीष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. प्रफुल यांच्या दुःखद निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी उरणमधील रिक्षा वाहतूक दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती.
प्रफुल पुरो यांच्या निधनाने रिक्षा चालक-मालकांचा आधार हरपला असून नागाव आणि म्हातवली क्षेत्रातील सामाजिक कार्यक्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. प्रफुल यांनी दीर्घकाळ समाजसेवा केली, असंख्य गरजू व्यक्तींना मदत केली आणि आपल्या सकारात्मक वृत्तीने त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले. त्यांचं साधं राहणीमान, प्रामाणिकपणा आणि समाजहितासाठी असलेलं असीम समर्पण येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.
नागाव येथील अमरधाम स्मशानभूमीत प्रफुल यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा विविध क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रफुल्ल यांचे पुत्र लैलेश यांनी त्यांना अग्नी दिला. याप्रसंगी उरण तालुका रिक्षा युनियनचे पदाधिकारी रवी कोळी, म्हातवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंत घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य चारुदत्त पाटील, उरण तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष काशिनाथ गायकवाड यांनी प्रफुल्ल पुरो यांच्या आठवणींना उजाळा दिला.
जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण,पत्नी, पुत्र, दोन मुली, जावई असा परिवार आहे.
Previous Post

महापालिका शाळेतील मुलींना ‘गुड टच, बॅड टच‘ तसेच सेल्फ डिफेन्सचे शिक्षणं द्यावे

Next Post

हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

Next Post
हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन प्रकल्पामध्ये मोफत घरे देण्याची शिवसेनेची मागणी

ऐरोली विभागात शवागृहासह शवविच्छेदन सुविधा उपलब्ध करुन देण्याची शिवसेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com