• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, May 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 20, 2026

भाजपचे नगरसेवक रविंद्र इथापे व प्रदीप गवस यांचे पद रद्द करण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कर्मचारी कायम सेवेचा प्रस्ताव अभिनंदनीय, पण तुर्तास वेतनवाढ करा : रविंद्र सावंत

कामगार नेते रविंद्र सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्तांकडे तक्रार

प्रवीण आजरा : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : प्रभागातील टेंडरवरुन महापालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर जाहिररित्या वाद घालणारे भाजपचे नगरसेवक रविंद्र इथापे आणि नगरसेवक प्रदीप गवस यांचे पद रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई महापालिकेतील भाजपचे नगरसेवक रविंद्र इथापे आणि नगरसेवक प्रदीप गवस हे महापालिकेतील टेंडर प्रक्रिया व ठेकेदारावरुन सभागृहात जाहिररित्या वाद घालत असल्याने नियम व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांचे नगरसेवक पद ऱद्द करावे, असे रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात कोणती विकासकामे करावीत, त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया मागवावी, टेंडरसाठी निविदा मागवाव्यात ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया आहे. कोणत्या कंपनीची निविदा योग्य आहे, कोणत्या ठेकेदाराला कमा द्यावे हा सर्वस्वी महापालिका प्रशासनाचा अधिकार आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करणे ही नियमबाह्य बाब असून कायद्याचा भंग केल्याचा प्रकार आहे. लोकप्रतिनिधींनी विकासकामे मंजूर करावीत व प्रशासकीय प्रक्रियेत काम मिळालेल्या ठेकेदाराकडून ती कामे व्यवस्थित करुन घ्यावी ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. त्यामोबदल्यात लोकप्रतिनिधींनापालिका प्रशासनाकडून ठराविक मानधनही मिळत असते.

निविदेमध्ये कामाचा उल्लेख असल्याने किती खर्च येणार हे निविदा भरणाऱ्या कंपनीला माहिती असते. त्यांनी यापूर्वी केलेल्या कामावरुन त्यांना अंदाज येत असतो. कोणी निविदा कमी भरत असेल व त्यातून महापालिका प्रशासनाचे काम होवून आर्थिक फायदा होत असेल तर त्यात लोकप्रतिनिधींनी वाद घालणे चुकीची आहे. तसेच कोणत्या कंपनीला/ ठेकेदाराला काम द्यावे यावरुन लोकप्रतिनिधी भांडत असतील तर ती गंभीर बाब असून नगरविकास खात्याने त्या प्रकारात गंभीरपणे लक्ष घालून तातडीने संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

नवी मुंबई महापालिकेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता विभागामध्ये काही दिवसांपूर्वीच रवींद्र इथापे व प्रदीप गवस या दोन नगरसेवकांमध्ये नवी मुंबई महापालिका अतिरिक्त शहर अभियंता विभागातील कामे प्रदान करण्याबाबत कडाक्याची भांडणे झाली. या भांडणामध्ये दोघेही जण आपल्या विभागातील काम अमुकच ठेकेदाराला द्यावे अशा प्रकारचा आग्रह धरत होते. त्याचप्रमाणे यातील एक सदस्य रवींद्र इथापे हे एका ठेकेदाराची भलामण करताना व त्यालाचा काम मिळाले पाहिजे, असे ठासून बोलताना दिसून येत आहेत याबाबतचे व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहेत व नवी मुंबईत ते व्हिडीओ व्हायरलही झालेले आहेत. नवी मुंबईच्या वर्तमानपत्रात त्याविषयीच्या बातम्याही प्रकाशित झालेल्या आहेत. नगरसेवक प्रदीप गवस हे वाद सुरु असताना हातामध्ये टेंडर संबंधित शासकीय कागद घेऊन माध्यमांना दाखवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १० नुसार या दोन्ही नगरसेवकांना अपात्र करावे, अशी मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.

महापालिका मुख्यालयात हे दोन्ही नगरसेवक टेंडरवरुन जाहिररित्या वाद घालत असतानाही पालिका आयुक्त व महापौर यांच्याकडून भूमिका मांडणे आवश्यक होते. तथापि इतके दिवस उलटल्यावरही आयुक्तांकडून व महापौरांकडून कोणतीही भूमिका स्पष्ट न झाल्याने या दोन्ही नगरसेवकांना पाठीशी घातले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. जनतेच्या पैशाचा वापर पारदर्शकपणे झाला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका असून प्रत्येक कामाची खरी गरज व त्यामागील हेतू नागरिकांसमोर स्पष्ट झाला पाहिजे. हा विरोध व दोन नगरसेवकांमध्ये विशिष्ठ ठेकेदाराच्या प्रेमापायी सुरु झालेला वाद कामाच्या गुणवत्तेसाठी आहे की एखाद्या “सोयीच्या कॉन्ट्रॅक्टरला” काम मिळावे यासाठी आहे, हे न समजण्याइतपत नवी मुंबईकर दुधखुळे नाहीत. लोकप्रतिनिधींनी कामाच्या गुणवत्तेबाबत आग्रही असावे, कोणाला काम द्यावे यासाठी नाही. लोकप्रतिनिधींनी ठेकेदारावरुन जाहिरपणे वाद घातल्याने व हा वाद नवी मुंबईच्या घराघरात समाजमाध्यमांवरील व्हिडिओद्वारे आणि वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यांवरुन पोहोचला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी पदाची प्रतिष्ठा कलंकित झाली असून महापालिकेच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे. जनसामान्यांमध्ये आर्थिक व्यवहारावरुन वेगळीच कुजबुज सुरु आहे. त्यामुळे निविदा देण्यावरुन वाद घालणाऱ्या व त्यातून लोकप्रतिनिधीपदाची तसेच महापालिकेचीही प्रतिष्ठा कलंकित करणाऱ्या रविंद्र इथापे व  प्रदीप गवस यांचे लोकप्रतिनिधी पद रद्द करणे आवश्यक आहे. याप्रकरणी कायदेशीर चौकशी करुन या दोन्ही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.

Previous Post

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ ते ४ उन्हात जाणे टाळा

Next Post

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा : कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

Next Post
स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा : कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा : कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com