• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, May 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 20, 2026

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा : कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा : कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : रायगड जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षक पदावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी प्रक्रिया अधिक प्रभावी करावी. सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीपासून आस्थापनांच्या तपासणीपर्यंतची सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत. महिन्याच्या कालावधीत याबाबत कार्यवाही पूर्ण व्हावी, असे निर्देश, कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.

नरिमन भवन येथे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने नोंदणीकृत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणींबाबत दुरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला विधान परिषद आमदार विक्रांत पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

तर प्रत्यक्ष बैठकीस कामगार विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मौड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदी उपस्थित होते.

सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, आस्थापनांची नोंदणी आणि खासगी संस्थांवर नियंत्रण ठेवणे ही मंडळाची मुख्य जबाबदारी आहे. ही कामे नियमित आणि प्रभावीपणे झाली पाहिजेत. लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य मिळाल्यास संबंधित आस्थापनांवर आवश्यक नियंत्रण आणणे शक्य होईल, असेही मंत्री ॲड. फुंडकर त्यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध आस्थापनांमध्ये बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सुमारे २५० सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याने रायगडमधील स्थानिक युवक रोजगाराच्या संधींपासून वंचित आहेत. सध्या रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या प्रतीक्षा यादीवर २ हजार ५३१ सुरक्षा रक्षक असून, त्यांच्या नियुक्तीद्वारे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असा अभिप्राय मंडळाने व्यक्त केला.

याबाबत ठाणे आणि रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, असे निर्देशही कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.

Previous Post

भाजपचे नगरसेवक रविंद्र इथापे व प्रदीप गवस यांचे पद रद्द करण्याची मागणी

Next Post

राजमाता जिजाऊ उद्यान व पामबीच मार्गालगतच्या नेरूळ सेक्टर सहा ते वजरानी चौकापर्यतच्या मॉर्निग वॉकवर संगीत यंत्रणा बसविण्याची युवा सेनेची मागणी

Next Post
राजमाता जिजाऊ उद्यान व पामबीच मार्गालगतच्या नेरूळ सेक्टर सहा ते वजरानी चौकापर्यतच्या मॉर्निग वॉकवर संगीत यंत्रणा बसविण्याची युवा सेनेची मागणी

राजमाता जिजाऊ उद्यान व पामबीच मार्गालगतच्या नेरूळ सेक्टर सहा ते वजरानी चौकापर्यतच्या मॉर्निग वॉकवर संगीत यंत्रणा बसविण्याची युवा सेनेची मागणी

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५०४ धोकादायक इमारतींची यादी जाहीर

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५०४ धोकादायक इमारतींची यादी जाहीर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com