• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, August 13, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 28, 2026

लंडन ते पंढरपूर या ग्लोबल वारी पालखीचे गुरुवारी नेरूळवासियांना दर्शन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
लंडन ते पंढरपूर या ग्लोबल वारी पालखीचे गुरुवारी नेरूळवासियांना दर्शन

स्वयम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : लंडन येथून पंढरपूर जाण्यासाठी निघालेली पहिली ग्लोबल वारी व पालखी गुरुवार, दि. २ जुलै रोजी नेरूळ येथे येत असून सारसोळे बसडेपोशेजारील श्री. गणेश शिव मंदिरात आगमन होणार आहे. नेरूळ व सभोवतालच्या नोडमधील भाविकांना या दिंडीत सहभागी होण्याची तसेच विठ्ठल पादुकांचे व विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर यंदा सातासमुद्रापार एक नवा इतिहास घडत आहे. इंग्लंडमधील लंडनच्या रॉयल विंडसर रेसकोर्स येथून सहा जून २०२६ रोजी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामघोषात आणि ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या गजरात जगातील पहिल्या ‘ग्लोबल वारी’चे प्रस्थान झाले. हातात भगव्या पताका, कपाळी गंध, टाळमृदंगाचा नाद आणि वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांमुळे लंडनमध्येच पंढरीचे वातावरण अनुभवायला मिळाले. महाराष्ट्रातील वारीचा हा उत्साह आणि भक्तिभाव पाहून अनेक परदेशी नागरिकांनीही या सोहळ्याबद्दल उत्सुकता दाखवत त्यात सहभाग नोंदविला.

सुमारे पन्नास दिवसांचा हा प्रवास अकरा देशांमधून होत आहे. इंग्लंड, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, लक्झेंबर्ग, जर्मनी, पोलंड, झेक प्रजासत्ताक, हंगेरी, रोमानिया, तुर्की व जॉर्जिया या देशांमधून ही दिंडी मार्गक्रमण करत भारतात येणार आहे. प्रत्येक देशात तेथील मराठी बांधव, भारतीय समाज आणि विठ्ठलभक्त या वारीचे स्वागत करीत असून, भजन, नामसंकीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठलनामाचा जागर घडवून आणला जात आहे. त्यामुळे ही वारी विविध देशांतील संस्कृती आणि भक्तिभाव यांना जोडणारा एक आध्यात्मिक सेतू बनली आहे. 

नेरूळमधील श्री. गणेश शिव मंदिरात २ जुलैला दुपारी तीन वाजता या वारीचे आगमन होणार असून दुपारी चार ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना विठ्ठल पादुकांचे व विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेता येणार आहे. या कार्यक्रमात नवी मुंबईतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक असलेल्या आध्यात्म, नवी मुंबई यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

Previous Post

लंडन ते पंढरपूर या ग्लोबल वारी पालखीचे गुरुवारी नेरूळवासियांना दर्शन

Next Post

नवी मुंबईत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
नवी मुंबईत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबईत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा नियत्रंण मिळेपर्यत बांधकामांवर बंदी आणा : नामदेव भगत

Shiv Sena Demands Naming of Navi Mumbai International Airport After People’s Leader D. B. Patil

नेरूळ-जुईनगरमधील पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्याची कॉंग्रेसची मागणी

नेरुल के नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान में टूटे खेल उपकरण और ओपन जिम की बदहाली, तत्काल मरम्मत की मांग

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com