• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 28, 2026

नवी मुंबईत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्याच दिवशी ८५ टक्के बालकांचे लसीकरण

७१६ लसीकरण बूथवर पालकांची गर्दी

उर्वरित बालकांसाठी २९ जून ते ३ जुलैदरम्यान घरपोच विशेष मोहीम

स्वयम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी (२८ जून) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. शहरातील २६ नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ६१५ स्थायी, ७४ ट्रान्झिट आणि २७ फिरते मोबाईल अशा एकूण ७१६ लसीकरण बूथवर पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने पहिल्याच दिवशी सुमारे ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले.

खाजगी दवाखाने, रुग्णालये, गृहनिर्माण सोसायट्या, रेल्वे स्थानके, बस डेपो, बाजारपेठा आणि मॉल आदी ठिकाणी लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी बालकांना पोलिओचे डोस दिले.

महापौर सुजाताताई पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कुकशेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन काही बालकांना पोलिओचे डोस पाजत मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे तसेच अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ या घोषवाक्याच्या माध्यमातून नागरी आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांनी घराघरांत जाऊन जनजागृती केली. त्यामुळे मोठ्या संख्येने पालकांनी आपल्या पाल्यांना लसीकरणासाठी बूथवर आणले.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या नियोजनामुळे मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

दरम्यान, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी २९ जून ते ३ जुलै या कालावधीत घराघरांत जाऊन विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. रविवारी बूथवर येऊ न शकलेल्या बालकांना घरी जाऊन पोलिओचे डोस दिले जाणार असून, महापालिकेच्या आरोग्य पथकांना व स्वयंसेवकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सुजाताताई पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

Previous Post

लंडन ते पंढरपूर या ग्लोबल वारी पालखीचे गुरुवारी नेरूळवासियांना दर्शन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com