• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, July 12, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 12, 2026

प्रवीण गाडे यांच्यावरील गुन्हा रद्द करा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कर्मचारी कायम सेवेचा प्रस्ताव अभिनंदनीय, पण तुर्तास वेतनवाढ करा : रविंद्र सावंत

महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नेरूळ येथील एल.पी. परिसरात अतिवृष्टीदरम्यान सीसीटीव्हीच्या विद्युत केबलमधून पाण्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे दोन शाळकरी विद्यार्थिनींना धक्का बसल्याच्या घटनेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा अन्यायकारक असून तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात सावंत यांनी म्हटले आहे की, संबंधित दुर्घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच प्रवीण गाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र महानगरपालिकेने पोलिसांना जबाबदारी निश्चित झालेली नसून चौकशी सुरू असल्याचे लेखी कळविले होते. तरीदेखील गाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षिततेची जबाबदारी कंत्राटदारावर असताना कार्यकारी अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करणे योग्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गेली 26 वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणारे प्रवीण गाडे हे निष्कलंक अधिकारी असून या दुर्घटनेशी त्यांचा थेट संबंध नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या प्रकरणात सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून प्रत्यक्ष दोषी व्यक्ती, संस्था किंवा कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी तसेच प्रवीण गाडे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा पुनर्विचार करून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केली आहे.
तसेच, कोणतीही जबाबदारी निश्चित होण्यापूर्वी गाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची घाई करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेचीही चौकशी करून आवश्यक असल्यास त्याच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या विषयावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या सर्वांना स्वतंत्रपणे निवेदन सादर केले आहे.

कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
पालिका प्रशासनातील प्रविण गाडे या प्रामाणिक अधिकाऱ्यांवर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता थेट गुन्हा दाखल झाल्याने महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केवळ घटनेचे खापर फोडण्यासाठी गाडे यांना बळीचा बकरा बनविला जात असल्याचा आरोप पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून केला जात आहे. याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा, निदर्शन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांकडून दिला जात असल्याने हे प्रकरण चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Previous Post

एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल नवीन १५० सीएनजी बसेसचे लोकार्पण

Next Post

जुन्नरच्या एसटी सेवेला मिळणार नवी गती

Next Post
जुन्नरच्या एसटी सेवेला मिळणार नवी गती

जुन्नरच्या एसटी सेवेला मिळणार नवी गती

‘…आणि रामा कलेक्टर झाला’

'...आणि रामा कलेक्टर झाला'

मुसळधार पावसामुळे पुणेकरांची पाणीकपात रद्द

मुसळधार पावसामुळे पुणेकरांची पाणीकपात रद्द

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com