• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, July 12, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 12, 2026

जुन्नरच्या एसटी सेवेला मिळणार नवी गती

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
जुन्नरच्या एसटी सेवेला मिळणार नवी गती

 आमदार शरद सोनावणे यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

महत्त्वाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जुन्नर : जुन्नरचे शिवसेना आमदार शरद सोनावणे यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन जुन्नर तालुक्यातील एसटी परिवहन सुविधांबाबत महत्त्वाचे निवेदन सादर केले. यावेळी तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी विविध विकासात्मक प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली असून अनेक महत्त्वाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आमदार सोनावणे यांनी सांगितले.

या भेटीत वाशी–नारायणगाव आणि कल्याण–चिंचोली या बंद झालेल्या एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच नारायणगाव एसटी आगारासाठी स्वतंत्र वाहनतळ उभारणे, जुन्नर–ओतूर–आळेफाटा येथे अद्ययावत एसटी आगार उभारणे, जुन्नर तालुक्यासाठी २० नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देणे आणि तालुक्यात ५० आधुनिक बसथांबे उभारण्याच्या प्रस्तावांनाही तत्त्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली.

या प्रस्तावांची अंमलबजावणी झाल्यास जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार परिवहन सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून तालुक्याच्या विकासालाही नवी चालना मिळणार आहे.

यावेळी शेतकरी नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष चव्हाण, श्रीराम सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज काळे उपस्थित होते.

यावेळी आमदार शरद सोनावणे यांनी, ‘जुन्नर तालुक्यातील नागरिकांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि दर्जेदार एसटी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक प्रश्नाचा शासन स्तरावर पाठपुरावा करत राहणार आहे,’ असे सांगितले.

Previous Post

प्रवीण गाडे यांच्यावरील गुन्हा रद्द करा

Next Post

‘…आणि रामा कलेक्टर झाला’

Next Post
‘…आणि रामा कलेक्टर झाला’

'...आणि रामा कलेक्टर झाला'

मुसळधार पावसामुळे पुणेकरांची पाणीकपात रद्द

मुसळधार पावसामुळे पुणेकरांची पाणीकपात रद्द

‘दूध भेसळीत दोषी कोणाचाही मुलाहिजा नाही’

'दूध भेसळीत दोषी कोणाचाही मुलाहिजा नाही'

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com